Vanrakshak Bharti 2025 Question Paper 07 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 Question Paper 06 साठी TCS Pattern नुसार विचारलेले महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. या पोस्टमध्ये घेतलेले सर्व प्रश्न वनरक्षक भरती 2023 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत.

प्रश्न 1: खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे ?
1) गंगा नदी
2) गोदावरी नदी
3) यमुना नदी
4) ब्रह्मपुत्रा नदी
उत्तर : 2) गोदावरी नदी
स्पष्टीकरण: गोदावरी नदी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याशी संबंधित येते. गोदावरी ही गंगा नदी नंतरची भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे, जी भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 10% व्यापते. गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. गोदावरी नदीची लांबी 1450 km इतकी आहे. या नदीला दक्षिणगंगा म्हणून देखील ओळखले जाते.
प्रश्न 2: प्रधानमंत्री ग्रामोदय योजना (PMGY) कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली आहे ?
1) 2000 साली
2) 1992 साली
3) 2010 साली
4) 2005 साली
उत्तर : 1) 2000 साली
स्पष्टीकरण: प्रधानमंत्री ग्रामोदय योजना (PMGY) 2000 साली सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील गरीब लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ही योजना सुरू करण्यात आली होती.
प्रश्न 3: भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावली ?
1) नवी दिल्ली – लखनऊ
2) नवी दिल्ली – कटरा
3) भुवनेश्वर – पुरी
4) नवी दिल्ली – वाराणसी
उत्तर : 4) नवी दिल्ली – वाराणसी
स्पष्टीकरण: 15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून तिचे उद्घाटन केले होते. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत ट्रेन धावली होती.
प्रश्न 4: ‘धुळे उठाव’ प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्याची संबंधित होता ?
1) पश्चिम बंगाल
2) गुजरात
3) महाराष्ट्र
4) उत्तर प्रदेश
उत्तर : 3) महाराष्ट्र
स्पष्टीकरण: धुळे उठाव हा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. धुळे जिल्हा पूर्वी पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता.
10 मे 1857 रोजी दिल्लीपासून 40 महिलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बंडाचे पडसाद महाराष्ट्रतही उमटले होते, या उठावा दरम्यान धुळे क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी उठाव केला होता.
प्रश्न 5: भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे देखील म्हटले जाते ?
1) पश्चिमेकडील
2) पूर्वेकडील
3) उत्तरेकडील
4) दक्षिणेकडील
उत्तर : 1) पश्चिमेकडील
स्पष्टीकरण: भारतातील पश्चिमेकडील घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे म्हटले जाते. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगराची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेजवळून चालू होते, व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचते.
प्रश्न 6: कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते ?
1) राज्यपाल
2) पंतप्रधान
3) देशाचे राष्ट्रपती
4) मुख्यमंत्री
उत्तर : 3) देशाचे राष्ट्रपती
स्पष्टीकरण: भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांत द्वारे न होता संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य आणि त्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांनी मिळून बनलेल्या निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते.
प्रश्न 7: दिलेल्या पर्यायांच्या आधारे, खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते ?
1) मोतीलाल नेहरू
2) जवाहरलाल नेहरू
3) डॉ. राजेंद्र प्रसाद
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 3) डॉ. राजेंद्र प्रसाद
स्पष्टीकरण: डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून तर हरेंद्रकुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
कॅबिनेट मिशनच्या शिफारशीवर आधारित जुलै 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती.
प्रश्न 8: यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजनादरम्यान तयार झाला असे मानले जाते ?
1) पश्चिम घाट
2) पूर्व घाट
3) उत्तर घाट
4) दक्षिण घाट
उत्तर : 1) पश्चिम घाट
स्पष्टीकरण: पश्चिम घाट हा दत्तांच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महादीपाच्या विभाजनादरम्यान तयार झाला आहे असे मानले जाते. सह्याद्री पर्वता पश्चिम घाट म्हणून देखील ओळखला जातो. ही सुमारे 1600 किमी लांबीची पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ज्या राज्यातून जाऊन भारताच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारी पर्यंत जाऊन पोहोचते.
प्रश्न 9: अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांग अडथळा म्हणून कार्य करते ?
1) पूर्वघाट
2) बंगालचा उपसागर
3) राजमहाल टेकड्या
4) पश्चिम घाट
उत्तर : 4) पश्चिम घाट
अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात पश्चिम घाट ही पर्वतरांग अडथळा म्हणून कार्य करते. भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र असे म्हणतात. अरबी समुद्र हा उत्तर हिंद महासागराचा एक प्रदेश आहे जो उत्तर-पूर्वेला आणि सोमालयाच्या पश्चिमेला भारतीय द्वीपकल्पाने आणि पूर्वेला अरबी द्वीपकल्पाने आणि उत्तरेला पाकिस्तान आणि इराण दक्षिणेला पाकिस्तान आणि इराणला वेढलेला आहे
प्रश्न 10: कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे ?
1) न्यूयॉर्क
2) लंडन
3) नवी दिल्ली
4) पर्थ
उत्तर : 2) लंडन
स्पष्टीकरण: लंडनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले लंडनचे महापौर मायकल मिलेनी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी केली.
प्रश्न 11: कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती ?
1) अमेरिका
2) जपान
3) चीन
4) नेदरलँड
उत्तर : 4) नेदरलँड
प्रश्न 12: गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) अमरावती
2) नांदेड
3) सोलापूर
4) जळगाव
उत्तर : 1) अमरावती
स्पष्टीकरण: गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्यात आहे. हे उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे.
प्रश्न 13: हिरोशिमा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो ?
1) 6 ऑगस्ट
2) 9 ऑगस्ट
3) 19 सप्टेंबर
4) 12 ऑगस्ट
उत्तर : 1) 6 ऑगस्ट
स्पष्टीकरण: 6 ऑगस्ट – हिरोशिमा दिन
9 ऑगस्ट – नागासाकी दिन
12 ऑगस्ट – जागतिक युवक दिन
प्रश्न 14: एका उत्पादिताचे दुसऱ्या उत्पादितात रूपांतर होण्याच्या दराला काय म्हणतात ?
1) QRT
2) PRT
3) MRT
4) SRT
उत्तर : 3) MRT
स्पष्टीकरण: एका उत्पादिताचे दुसऱ्या उत्पादितात रूपांतर होण्याच्या दराला MRT म्हणतात. MRT म्हणजे (Marginal Rate of Trnasformation) मार्जिनल रेट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन याच्या मदतीने कमोडिटीचे अतिरिक्त युनिट तयार करण्यासाठी खर्चाचे विश्लेषण केले जाते. हे उत्पादन संभाव्यता सीमारेषेची जवळून विणलेले आहे, जे समान संसाधने वापरून दोन वस्तूंच्या उत्पादनावरील संभाव्यता दर्शवते.
प्रश्न 15: पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता ?
1) 1858 साली
2) 1856 साली
3) 1865 साली
4) 1875 साली
उत्तर : 2) 1856 साली
स्पष्टीकरण: पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम 1856 साली लागू करण्यात आला होता. या कायद्याद्वारे हिंदू विधवांनी केलेले पुनर्विवाह कायदेशीर ठरले. याचा मसुदा लॉर्ड डलहौसीच्या सत्ता काळात लिहिण्यात आला आणि लॉर्ड कॅनिंगने हा अमलात आणला. हा कायदा 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धा आधी 27 जुलै 1856 रोजी अमलात आला.
प्रश्न 16: ठराविक मार्गांवरील दोन क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हणतात ?
1) ऋतुचारण स्थलांतर
2) शहर ते शहर
3) वयानुसार स्थलांतर
4) ग्रामीण ते ग्रामीण
उत्तर : 1) ऋतुचारण स्थलांतर
स्पष्टीकरण: कायमस्वरूपी किंवा तात्पुरते राहण्याच्या उद्देशाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला स्थलांतर असे म्हणतात.
ठराविक मार्गांवरील दोन क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरासह केलेल्या हंगामी स्थलांतरास ऋतुचारण स्थलांतर असे म्हणतात.
प्रश्न 17: ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80cm पेक्षा कमी असते, त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते ?
1) मान्सून शेती
2) कोरडवाहू शेती
3) ओलिताची शेती
4) ठिबक शेती
उत्तर : 2) कोरडवाहू शेती
स्पष्टीकरण: ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80cm पेक्षा कमी असते, त्या भागात कोरडवाहू शेती केली जाते. कारण ती शेती ही कोणत्याही पाण्यावर न येता ती केवळ आणि केवळ पावसाच्या पाण्यावर येते अशा शेतीला आपण कोरडवाहू शेती असे म्हणतो.
प्रश्न 18: उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
1) विमान
2) द्रविड
3) नागर
4) गोपुरम
उत्तर : 3) नागर
स्पष्टीकरण: उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला नागर या नावाने ओळखले जाते. नागरशैली किंवा नगरशैली ही उत्तर भारतीय हिंदू मंदिरांच्या वास्तुकलेच्या तीन शैलींपैकी एक आहे. वास्तुशास्त्रानुसार, नागरशैलीतील मंदिराचे बांधकाम पायापासून ते कळसाच्या टोकापर्यंत चौकोनी असते. दक्षिण भारतात द्रविड मंदिर स्थापत्य शैलीचा विकास झाला आहे.
प्रश्न 19: ………….. हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली व्यक्ती होते व लवकरच ते त्यांचे आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले.
1) नारायण गुरु
2) ईश्वरचंद्र विद्यासागर
3) राजा राममोहन रॉय
4) महात्मा गांधी
उत्तर : 3) राजा राममोहन रॉय
स्पष्टीकरण: राजा राममोहन रॉय हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली व्यक्ती ठरले. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म 22 मे 1772 रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला आणि ते ब्राह्मण समाजाचे संस्थापक होते.
त्यांच्या प्रयत्नाने 1829 मध्ये सतीबंदी कायदा संमत करण्यात आला.
प्रश्न 20: कोणत्या राज्यामध्ये ‘राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते ?
1) तामिळनाडू
2) आंध्र प्रदेश
3) पश्चिम बंगाल
4) ओडिशा
उत्तर : 4) ओडिशा
स्पष्टीकरण: 27 जानेवारी 2024 रोजी चौथ्या ‘राष्ट्रीय चलिका पक्षी महोत्सवाचे’ उद्घाटन केले. 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान महोत्सव पार पडला. चिलीका हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 07 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07