Vanrakshak Bharti 2025 Question Paper 06 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 06
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 Question Paper 06 साठी TCS Pattern नुसार विचारलेले महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. या पोस्टमध्ये घेतलेले सर्व प्रश्न वनरक्षक भरती 2023 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत.

प्रश्न 1: नागरिक सुधारणा अधिनियम (CAA) संसदीद्वारे कधी मंजूर करण्यात आला होता ?
1) 2016 साली
2) 2018 साली
3) 2019 साली
4) 2020 साली
उत्तर : 2019 साली
स्पष्टीकरण: या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली. हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख यांना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. या अधिनियमांमधून मुस्लिम अल्पसंख्याकांना वगळण्यात आले आहे. सद्यस्थितीत भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणे आवश्यक असते.
प्रश्न 2: 2011 च्या जनगणनेनुसार, गोव्यातील शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे ?
1) 32.55 टक्के
2) 29.55 टक्के
3) 54.66 टक्के
4) 62.17 टक्के
उत्तर : 62.17 टक्के
स्पष्टीकरण: 2011 च्या जनगणनेनुसार, गोवा हे 62.17% शहरी लोकसंख्येसह सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे. 2001 पासून जेव्हा गोव्याची शहरी लोकसंख्या 49.8 टक्के होती तेव्हापासून त्यात लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
प्रश्न 3: भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ?
1) वूलर सरोवर
2) चिल्का सरोवर
3) दल सरोवर
4) लोकटाक सरोवर
उत्तर : चिल्का सरोवर
स्पष्टीकरण: चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का सरोवर हे भारताच्या पूर्व भागातील ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यात पसरलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्षांसाठी व या सरोवरातील वनस्पती आणि जनावरांच्या अनेक प्रजातींसाठी हे ओळखले जाते.
प्रश्न 4: केंद्र सरकारने कोणाची विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे ?
1) संदीप माहेश्वरी
2) विवेक बिंद्रा
3) अमिताभ शाह
4) शाहरुख खान
उत्तर : अमिताभ शाह
स्पष्टीकरण: केंद्र सरकारने प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आणि युवा अनस्टॉपेबल या NGO चे संस्थापक अमिताभ शाह यांची विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.
प्रश्न 5: खालीलपैकी कोणत्या अनुछेदनुसार अस्पृश्यतेची निर्मूलन केले गेले आहे आणि त्याच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे ?
1) अनुच्छेद 16
2) अनुच्छेद 17
3) अनुच्छेद 15
4) अनुच्छेद 19
उत्तर : अनुच्छेद 17
स्पष्टीकरण: अनुच्छेद 17 या अनुछेदा नुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे. अस्पृशतामुळे उद्भवणारी कोणतीही असमर्थता लादणे कायद्यानुसार दंडणीय गुन्हा असेल.
प्रश्न 6: महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?
1) महात्मा ज्योतिबा फुले
2) डॉ. बी. आर. आंबेडकर
3) नाना पाटील
4) वसंत दादा पाटील
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
स्पष्टीकरण: 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ही एक सामाजिक सुधारणा संस्था होती. याने शिक्षणाच्या मिशनचे समर्थन केले आणि वंचित गटांसाठी सामाजिक अधिकार आणि राजकीय प्रवेश वाढवला विशेषतः महिलांवर लक्ष केंद्रित केले.
प्रश्न 7: माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामात, वारा मुख्य भूभागाकडून …………. कडे वाहतो.
1) हिमालय
2) ईशान्यकडील प्रदेश
3) बंगालचा उपसागर
4) पूर्वेकडील प्रदेश
उत्तर : बंगालचा उपसागर
स्पष्टीकरण: माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामात वारा मुख्य भूभागाकडून बंगालच्या उपसागराकडे वाहतो.
भारताच्या हवामानावर मान्सूनचा जोरदार प्रभाव पडतो. नैऋत्य मोसमी हंगामात बंगालच्या उपसागरातून व अरबी समुद्रातून मुख्य भूभागाकडे वारे वाहतात.
प्रश्न 8: आयुष्यमान योजनेत एक कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले ?
1) उत्तर प्रदेश
2) अरुणाचल प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) आसाम
उत्तर : आसाम
स्पष्टीकरण: आयुष्यमान योजनेत एक कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे आसाम देशातील पहिले राज्य बनल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी 11 फेब्रुवारी 2024 रोजी केला. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रति वर्ष पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जातो.
प्रश्न 9: नागा टेकड्यांमधील सारामती या सर्वोच्च शिखराची उंची खालीलपैकी किती आहे ?
1) 2695 मीटर
2) 3826 मीटर
3) 1358 मीटर
4) 1646 मीटर
उत्तर : 3826 मीटर
प्रश्न 10: 1812 मध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला ?
1) पंजाब
2) गुजरात
3) पश्चिम बंगाल
4) आसाम
उत्तर : पश्चिम बंगाल
स्पष्टीकरण: देशातील पहिली कागद गिरणी सन 1812 मध्ये सेरामपुर – बंगाल येथे स्थापन झाली, परंतु कागदाच्या मागणी अभावी ती अयशस्वी झाली. सन 1870 मध्ये कोलकत्ता जवळील बालीगंज येथे हा उपक्रम पुन्हा सुरू झाला.
प्रश्न 11: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली ?
1) 1857 साली
2) 1885 साली
3) 1890 साली
4) 1930 साली
उत्तर : 1885 साली
स्पष्टीकरण: 28 डिसेंबर 1885 रोजी ॲलन ह्युम, दादाभाई नवरोजी आणि दिनशा वाच्छा यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली.
प्रश्न 12: उत्पादनाच्या साधनांची मालकी बहुतांशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असणे, या अर्थव्यवस्थेला …………. असे म्हणतात.
1) राजेशाही अर्थव्यवस्था
2) समाजवादी अर्थव्यवस्था
3) मिश्र अर्थव्यवस्था
4) भांडवलशाही अर्थव्यवस्था
उत्तर : भांडवलशाही अर्थव्यवस्था
स्पष्टीकरण: उत्पादनाच्या साधनांची मालकी बहुतांशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असणे, तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते.
प्रश्न 13: क्योटो विद्यापीठ आणि सुमितोमो फॉरेस्ट्री या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाचे नाव काय आहे ?
1) वूडसॅट
2) टिंबरसॅट
3) ग्रोव्ह सॅट
4) लिग्नोसॅट
उत्तर : लिग्नोसॅट
स्पष्टीकरण: क्योटो विद्यापीठ आणि सुमितोमो फॉरेस्ट्री या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेला जगातील पहिला लाकडी उपग्रह 28 मे 2024 रोजी पत्रकार परिषदेत दाखवण्यात आला. लिग्नोसॅट असे या उपग्रहाचे नाव आहे.
प्रश्न 14: भूस्खलनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशी मठ हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) अरुणाचल प्रदेश
2) उत्तराखंड
3) हिमाचल प्रदेश
4) सिक्कीम
उत्तर : उत्तराखंड
स्पष्टीकरण: भूस्खलनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशी मठ हे भारतातील उत्तराखंड या राज्यात आहे. जोशी मठ उत्तराखंडाच्या उत्तर भागात हिमालय पर्वत रांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या 295 किमी ईशान्येस स्थित आहे.
प्रश्न 15: खालीलपैकी कोणी संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला ?
1) एस. जयशंकर
2) अमित शहा
3) राजनाथ सिंह
4) निर्मला सीतारामन
उत्तर : निर्मला सीतारामन
स्पष्टीकरण: केंद्रीय वित्त मंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला होता.
प्रश्न 16: राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्त्व स्थळ असून ते सध्या कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) हरियाणा
2) लाहोर
3) कराची
4) काबुल
उत्तर : हरियाणा
स्पष्टीकरण: आत्ताच्या भारत आणि पाकिस्तानच्या वायव्येस 5300 वर्षापूर्वी ही सिंधू संस्कृती उदयास आली.
या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हटले गेले.
राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्त्व स्थळ असून ते सध्याच्या हरियाणा राज्यात स्थित आहे.
प्रश्न 17: 15 मे 2024 रोजी निधन झालेल्या मालती जोशी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ?
1) नृत्य
2) गायन
3) साहित्य
4) क्रीडा
उत्तर : साहित्य
स्पष्टीकरण: कादंबरीकार आणि लेखिका मालती जोशी यांचे 15 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले.
4 जून 1934 रोजी त्यांचा छत्रपती संभाजीनगर मध्ये जन्म झाला होता. 2018 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रश्न 18: एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हणतात ?
1) विश्ववाद
2) राष्ट्रवादी
3) नाझीवाद
4) साम्राज्यवाद
उत्तर : साम्राज्यवाद
स्पष्टीकरण: साम्राज्यवाद – एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला साम्राज्यवाद म्हणतात.
प्रश्न 19: माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी, हवेतील आर्द्रतेमुळे हवामान उष्ण व दमट होते, या घटनेला काय म्हणतात ?
1) ऑक्टोबर हिट
2) चक्रीवादळ
3) नोव्हेंबर हिट
4) ऍडव्हान्सिंग मान्सून
उत्तर : ऑक्टोबर हिट
स्पष्टीकरण: माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी हवेतील आर्द्रतेमुळे हवामान उष्ण व दमट होते या घटनेला ऑक्टोबर हिट असे म्हणतात. पाऊस नसल्यामुळे ऑक्टोबर हिट निर्माण होते. भारतीय उपखंडातील ऑक्टोबर महिन्यातील हवामानाला ऑक्टोबर हिट असे म्हणतात.
प्रश्न 20: तेराव्या लोकसभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली ?
1) जून 1991
2) ऑक्टोबर 1999
3) मे 1996
4) मार्च 1977
उत्तर : ऑक्टोबर 1999
स्पष्टीकरण: तेराव्या लोकसभेचा कार्यकाल – 10 ऑक्टोबर 1999 ते 6 फेब्रुवारी 2004
18 व्या लोकसभेचा कार्यकाल – जून 2024 ते जून 2019 असेल.
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 06 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 06