Vanrakshak Bharti 2025 Question Paper 05 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 05
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 Question Paper 05 साठी TCS Pattern नुसार विचारलेले महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. या पोस्टमध्ये घेतलेले सर्व प्रश्न वनरक्षक भरती 2023 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत.

प्रश्न 1: 1929 च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची उद्दिष्ट घोषित केले गेले, हे अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते ?
1) सुरत
2) लाहोर
3) नागपूर
4) कलकत्ता
उत्तर : 2) लाहोर
स्पष्टीकरण: 31 डिसेंबर 1929 रोजी तत्कालीन पंजाब प्रांताची राजधानी लाहोर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरले होते.
या ऐतिहासिक अधिवेशनात काँग्रेसचा ‘संपूर्ण स्वराज’ चा जाहीरनामा तयार करण्यात आला आणि संपूर्ण स्वराज हे काँग्रेसचे प्रमुख ध्येय घोषित करण्यात आले. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती.
प्रश्न 2: खाली नमूद केलेल्या कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीव अभयारण्य आहेत ?
1) बिहार
2) उत्तर प्रदेश
3) अंदमान आणि निकोबार बेटे
4) मध्य प्रदेश
उत्तर : 3) अंदमान आणि निकोबार बेटे
स्पष्टीकरण: भारतातील सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने मध्य प्रदेशात आहेत. भारतात 500 हून अधिक अभयारण्य आहेत. अंदमान आणि निकोबार बेट या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य आहेत. येथे 96 वन्यजीव अभयारण्य आणि 9 राष्ट्रीय उद्याने आहेत.
प्रश्न 3: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ……………. वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.
1) 18 ते 60 वर्षे
2) 18 ते 40 वर्षे
3) 18 ते 70 वर्षे
4) 18 ते 50 वर्षे
उत्तर : 3) 18 ते 70 वर्षे
स्पष्टीकरण: प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला वार्षिक फक्त 12 रुपये जमा करावे लागतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास विमा धारकाला दोन लाख देण्याची तरतूद आहे.
प्रश्न 4: 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे ?
1) उत्तर प्रदेश
2) पंजाब
3) बिहार
4) अरुणाचल प्रदेश
उत्तर : 1) उत्तर प्रदेश
स्पष्टीकरण: सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील उत्तर प्रदेश राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या जास्त आहे. उत्तर प्रदेशचे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 20.69% लोक हे अनुसूचित जातींचे आहेत.
प्रश्न 5: भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ची कल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे ?
1) चीन
2) जपान
3) ब्रिटन
4) ऑस्ट्रेलिया
उत्तर : 4) ऑस्ट्रेलिया
स्पष्टीकरण: भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ही कल्पना ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे. समोरची सूची, व्यापार, वाणिज्य आणि व्यापार संबंध यांचे स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक ही ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.
प्रश्न 6: खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतीय स्तरावरील द्वंद्ववाद रद्द करण्यात आला ?
1) 1784 चा पिट्स इंडिया कायदा
2) 1773 चा नियमन कायदा
3) 1813 चा सनदी कायदा
4) 1935 चा भारत सरकार कायदा
उत्तर : 4) 1935 चा भारत सरकार कायदा
स्पष्टीकरण: 1935 चा भारत सरकार कायद्यानुसार प्रांतीय स्तरावरील द्विदल पद्धत रद्द करण्यात आली. भारताच्या प्रांतातील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात आला. तीन गोलमेज परिषदा नंतर हा कायदा पास झाला.
प्रश्न 7: धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
1) 1893 साली
2) 1898 साली
3) 1890 साली
4) 1895 साली
उत्तर : 1) 1893 साली
स्पष्टीकरण: धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना 1893 साली केली. धोंडो केशव कर्वे यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षाचे जीवन समर्पित केले.
प्रश्न 8: कुतुबमिनार कधी बांधला गेला ?
1) 14 व्या शतकाच्या सुरुवातीस
2) 13 व्या शतकाच्या सुरुवातीस
3) 17 व्या शतकाच्या सुरुवातीस
4) 15 व्या शतकाच्या सुरुवातीस
उत्तर : 2) 13 व्या शतकाच्या सुरुवातीस
स्पष्टीकरण: कुतुबमिनार 13 व्या शतकाच्या सुरुवातीस बांधला गेला. कुतुब मिनार ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे.
हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे. ही वास्तू युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात देखील घोषित केली आहे.
गुलाम घराण्याचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक या सुलतानाने सुफी संत कुतुबुद्दीन बखतियार काकी यांच्या स्मरणार्थ कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात केली. सन 1993 मध्ये युनेस्कोने या वास्तूस जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.
प्रश्न 9: मुंबई कायदेमंडळात 4 ऑगस्ट 1923 रोजी ‘सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा’ असा ठराव कोणी मांडला ?
1) विठ्ठल रामजी शिंदे
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) सिताराम बोले
4) पंडित जवाहरलाल नेहरू
उत्तर : 3) सिताराम बोले
प्रश्न 10: भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकार हे कोणाच्या नावावर आहेत ?
1) भारताचे गृहमंत्री
2) भारताचे पंतप्रधान
3) भारताचे राष्ट्रपती
4) भारताचे सरन्यायाधीश
उत्तर : 3) भारताचे राष्ट्रपती
स्पष्टीकरण: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 53 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, राष्ट्रपती त्यांच्या अधिकारांचा प्रत्यक्ष किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत वापर करू शकतात, पण प्रत्यक्षात राष्ट्रपतींना दिलेले सर्व कार्यकारी अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान वापरतात.
प्रश्न 11: त्सुनामीच्या वेळी 2004 मध्ये समुद्राच्या पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय आहे ?
1) इंदिरा पॉईंट
2) उल्का बिंदू
3) जावा पॉईंट
4) सुंदा पॉईंट
उत्तर : 1) इंदिरा पॉईंट
स्पष्टीकरण: त्सुनामीच्या वेळी 2004 मध्ये पाण्याखाली बुडालेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव इंदिरा पॉईंट आहे. इंदिरा पॉईंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. 2004 च्या त्सुनामी मध्ये येथे राहणाऱ्या 20 कुटुंबांपैकी 16 कुटुंबे बेपत्ता झाली होती.
प्रश्न 12: 2022 पर्यंतच्या माहितीनुसार, खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात लहान रेल्वे क्षेत्र होते ?
1) पश्चिम रेल्वे क्षेत्र
2) उत्तर रेल्वे क्षेत्र
3) ईशान्य रेल्वे क्षेत्र
4) दक्षिण रेल्वे क्षेत्र
उत्तर : 3) ईशान्य रेल्वे क्षेत्र
स्पष्टीकरण: सन 2022 पर्यंतच्या माहितीनुसार, ईशान्य रेल्वे क्षेत्र भारतातील सर्वात लहान रेल्वे क्षेत्र आहे. सध्या भारतीय रेल्वेचे 18 झोन आणि 70 विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे नेतृत्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक करतात, जो झोनच्या महाव्यवस्थापकांना अहवाल देतात. भारतीय रेल्वेमध्ये सर्वात मोठा झोन उत्तर रेल्वे आहे. सर्वात लहान रेल्वे क्षेत्र ईशान्य रेल्वे क्षेत्र आहे.
प्रश्न 13: सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची ……….. आहे.
1) 6000 – 7500 मी.
2) 1000 – 1200 मी.
3) 4000 – 5000 मी.
4) 2000 – 3000 मी.
उत्तर : 2) 1000 – 1200 मी.
स्पष्टीकरण: सह्याद्री पर्वतरांगावरून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सरासरी उंची ही 1000 – 1200 मी. आहे. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्या शेजारी उभी असलेली डोंगराची रांग आहे. ही अंदाजे 1700 km लांबीची डोंगर रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते आणि केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचते.
प्रश्न 14: पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप मे 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडली ?
1) टोकियो
2) बँकॉक
3) जकार्ता
4) नवी दिल्ली
उत्तर : 2) बँकॉक
स्पष्टीकरण: विश्व एकवीस मे 2024 रोजी बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या पहिल्या आशियाई चॅम्पियनशिप मध्ये भारतीय एथलेटिक दलाने तीन पदके जिंकली. भारतीय संघाने 4×400 मीटर मिश्र रिलेमध्ये 3 मिनिटे 14.1 सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमासह एक सुवर्णपदक मिळवले.
त्यामध्ये मोहम्मद अजमल, ज्योतिका श्री दांडी, अमोल जेकब आणि सुभा व्यंकटेशने यांचा समावेश होता.
प्रश्न 15: काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपींवर कोणाच्या सत्र न्यायालयात खटला चालवला होता ?
1) ह्यू हेनरी गफ
2) विल्यम ग्रेटहेड
3) ए. हॅमिल्टन
4) जॉन गोल्ड्सबरो
उत्तर : 3) ए. हॅमिल्टन
स्पष्टीकरण: काकोरी कट : काकोरी कट हा लखनऊ जवळील काकोरी गावात 9 ऑगस्ट 1925 रोजी रेल्वेमध्ये असलेला खजिना लुटण्याचा कट होता. त्यात रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आजाद, ठाकूर रोशन सिंग व इतर क्रांतिकारक खजिना लुटण्यासाठी होते.nया सर्व क्रांतिकारकांवर खटला एक मे 1926 रोजी न्यायमूर्ती ए. हॅमिल्टन विशेष सत्र न्यायालयात सुरू झाला होता.
प्रश्न 16: महाराष्ट्रातील दलित चळवळीला आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण होते ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) अच्युतराव पटवर्धन
3) अरुणा असफ अली
4) अश्फाक उल्ला खान
उत्तर : 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील दलित चळवळीला आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यांनी वसाहती काळात समाजाचे प्रतिनिधित्व केले आणि नंतर भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून काम केले. दलित चळवळीचे ब्रीदवाक्य ‘सर्वांसाठी समानता’ हे होते.
प्रश्न 17: खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबातच्या आखातास मिळते ?
1) लुणी नदी
2) साबरमती नदी
3) तापी नदी
4) मही नदी
उत्तर : 4) मही नदी
प्रश्न 18: खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक होते ?
1) जयश्री भोसले
2) शरद अनंतराव जोशी
3) विनायक वेलणकर
4) रूही तिवारी
उत्तर : 2) शरद अनंतराव जोशी
स्पष्टीकरण: महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश मध्ये ही शेतकरी आंदोलने उभारली. स्त्रियांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवला.
शरद जोशी हे महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीचे संस्थापक होते.
प्रश्न 19: खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही ?
1) फर्ग्युसन कॉलेज
2) परमहंस मंडळी
3) न्यू इंग्लिश स्कूल
4) डेक्कन एज्युकेशन सोसायटी
उत्तर : 2) परमहंस मंडळी
स्पष्टीकरण: परमहंस मंडळीची स्थापना दुर्गाराम मेहताजी, दादोबा पांडुरंग आणि त्यांच्या मित्रांच्या गटाने केली होती. परमहंस मंडळी हा एक गुप्त सामाजिक धर्म गट होता, ज्याची स्थापना 1849 मध्ये मुंबई या ठिकाणी झाली. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाज सुधारक पत्रकार व शिक्षक तज्ञ होते. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला.
प्रश्न 20: नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ची स्थापना जुलै 1982 मध्ये …………. समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली .
1) बी. शिवरामन समिती
2) राजमन्नार समिती
3) तेंडुलकर समिती
4) शहा समिती
उत्तर : 1) बी. शिवरामन समिती
स्पष्टीकरण: बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा 1981 मध्ये संसदेत पास करण्यात आला. RBI च्या कृषी पतविभाग, ग्रामीण नियोजन आणि पथकक्ष व कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांच्या एकत्रिकीकरणातून 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना करण्यात आली.
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 05 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 05