Vanrakshak Bharti 2025 Question Paper 04 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 04

Vanrakshak Bharti 2025 Question Paper 04 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 04

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 साठी TCS Pattern नुसार विचारलेले महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत.  या पोस्टमध्ये घेतलेले सर्व प्रश्न वनरक्षक भरती 2023 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत.

Vanrakshak Bharti 2025 Question Paper 04
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 04 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 04

प्रश्न 1: ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
1) चंद्रपूर
2) अकोला
3) गडचिरोली
4) हिंगोली
उत्तर : 1) चंद्रपूर
स्पष्टीकरण : ताडोबा राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर पासून 45 किमी आणि चिमूर पासून 32 किमी अंतरावर आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प आहे यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे. 1955 पासूनचे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते.

प्रश्न 2: महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
1) रत्नागिरी
2) चंद्रपूर
3) अमरावती
4) गडचिरोली
उत्तर : 3) अमरावती
स्पष्टीकरण : गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.

प्रश्न 3: खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे ?
1) रामगड
2) झरिया
3) राणीगंज
4) गिरीडोह
उत्तर : 3) राणीगंज
स्पष्टीकरण : भारतात कोळशाच्या व्यावसायिक वापराची कहाणी ही पश्चिम बंगालच्या राणीगंजमधून सुरू झाली.
त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीने नारायण कुडी परिसरात 1774 मध्ये सर्वात आधी कोळसा खाणीतून कोळसा उत्खनन सुरू केले. राणीगंज कोळसा क्षेत्र हे भारतातील सर्वात जुनी कोळसा खाण आहे.

प्रश्न 4: तेराव्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले आहे ?
1) दुसरा अवंतीवर्मन
2) पहिला राजराजा
3) दुसरा राजेंद्र
4) पहिला नरसिंहदेव
उत्तर : 4) पहिला नरसिंहदेव
स्पष्टीकरण : पूर्व गंगा राजवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम याने 1250 च्या सुमारास कोणार्क येथील सूर्य मंदिर बांधले होते. कोणार्क सूर्य मंदिर हे हिंदू सूर्यदेव सूर्याला समर्पित एक प्रसिद्ध भारतीय मंदिर आहे, हे मंदिर 1984 मध्ये युनेस्कोने विश्व वारसा स्थळ घोषित केले होते.

प्रश्न 5: केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली ?
1) 1999 साली
2) 2019 साली
3) 2000 साली
4) 2021 साली
उत्तर : 3) 2000 साली
स्पष्टीकरण : प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना देशात 2000 साली सुरू झाली.
दारिद्र्य कमी करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताच्या अनकनेक्टेड वस्त्यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा त्यामागचा उद्देश होता. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारसह ग्रामीण विकास मंत्रालय जबाबदार आहे.

प्रश्न 6: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात, नांदूर मधमेश्वर ही रामसर पाणथळ जागा (वेटलँड) आहे ?
1) अकोला
2) लातूर
3) बालाघाट
4) नाशिक
उत्तर : 4) नाशिक
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात, नांदूर मधमेश्वर ही रामसर पाणथळ जागा आहे. नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा एक मोठा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपुर म्हणून देखील ओळखले जाते.

प्रश्न 7: खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते ?
1) महात्मा ज्योतिबा फुले
2) गोपाळ कृष्ण गोखले
3) लोकमान्य टिळक
4) न्यायमूर्ती रानडे
उत्तर : 1) महात्मा ज्योतिबा फुले
स्पष्टीकरण : महात्मा ज्योतिबा फुले हे भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जातात.
महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले.

Talathi Bharti 2025 Question Paper 05

प्रश्न 8: मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थानात …………. सहज द्विदल राज्यपद्धती सुरू केली.
1) भारत सरकार अधिनियम 1935
2) भारत सरकार अधिनियम 1919
3) भारत सरकार अधिनियम 1859
4) भारत सरकार अधिनियम 1909
उत्तर : 2) भारत सरकार अधिनियम 1919
स्पष्टीकरण : मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थानात भारत सरकार अधिनियम 1919 नुसार द्विदल राज्यपद्धती सुरू केली होती. त्यानुसार केंद्र आणि प्रांतीय सरकारांचे अधिकार स्पष्टपणे विभागले गेले होते.

प्रश्न 9: खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क दिलेला आहे ?
1) अनुच्छेद 8
2) अनुच्छेद 30
3) अनुच्छेद 4
4) अनुच्छेद 32
उत्तर : 4) अनुच्छेद 32
स्पष्टीकरण : अनुच्छेद 32 या अनुछेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा असे संबोधले होते.

प्रश्न 10: गारो, खासी आणि जैतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात ?
1) पूर्वांचल
2) पीर पंजाल
3) झास्कर
4) धौलाधार
उत्तर : 1) पूर्वांचल
स्पष्टीकरण : गारो, खासी आणि जयंतिया या टेकड्या पूर्वांचल पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात. गारो पर्वतही भारतीय मेघालय राज्यातील लहान पर्वतांची एक श्रेणी आहे. ज्यामध्ये मेघालय, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण गारो या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. ईशान्यकडील पर्वतीय प्रदेश पूर्वांचल, मेघालय पठार आणि आसामचे खोरे अशा तीन प्राकृतिक विभागात विभागला जातो.

प्रश्न 11: तिसरे अँग्लो – मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षांच्या दरम्यान लढले गेले ?
1) 1816 – 1819
2) 1819 – 1822
3) 1814 – 1818
4) 1813 – 1816
उत्तर : 1) 1816 – 1819
स्पष्टीकरण : तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे इ.स. 1816 – 1819 मध्ये मराठी व इंग्रज यांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

प्रश्न 12: क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे ?
1) पेंच व्याघ्र प्रकल्प
2) बांदीपूर व्याघ्र प्रकल्प
3) बांधवगड
4) नागार्जुनसागर श्रीशैलम
उत्तर : 4) नागार्जुनसागर श्रीशैलम
स्पष्टीकरण : नागार्जुनसागर श्रीशैलम हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे.
नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र अभयारण्यात 1978 मध्ये अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले आहे आणि यास 1983 मध्ये व्याघ्र प्रकल्प संरक्षणाखाली आणले गेले. नागार्जुनसागर श्रीशैलम हे आंध्र प्रदेशात आहे.

प्रश्न 13: खालीलपैकी कोणते भारतीय राज्य तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे ?
1) बिहार
2) पश्चिम बंगाल
3) मिझोरम
4) त्रिपुरा
उत्तर : 4) त्रिपुरा
स्पष्टीकरण : त्रिपुरा याच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेने बांगलादेशाने वेढलेले आहे. आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे. त्रिपुरा राज्याची सीमा बांगलादेश, मिझोरम आणि आसाम यांना लागते.

प्रश्न 14: सह्याद्रीचा उतार कोणत्या दिशेला होत जातो ?
1) दक्षिण आणि नैऋत्य
2) उत्तर आणि ईशान्य
3) पूर्व आणि आग्नेय
4) पूर्व
उत्तर : 3) पूर्व आणि आग्नेय
स्पष्टीकरण : सह्याद्रीचा उतार पूर्व आणि आग्नेय दिशेला होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्राचे पठार म्हणून ओळखले जाते.सह्याद्री ही अंदाजे 1600 km लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र – गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यातून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचते.

प्रश्न 15: खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातींसाठी शाळा उघडली आणि 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील केली ?
1) बी. आर. आंबेडकर
2) दादाभाई नौरोजी
3) महात्मा ज्योतिबा फुले
4) महात्मा गांधी
उत्तर : 3) महात्मा ज्योतिबा फुले
स्पष्टीकरण : महात्मा फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली.
तसेच 1852 मध्ये वेताळ पेठेत दलितांसाठी पहिली शाळा काढली. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात केली. जमीनदार, पुरोहितांकडून होणारा अन्याय, अत्याचारापासून व गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करणे हा उद्देश त्यामागे होता.

प्रश्न 16: अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयांशी संबंधित आहे ?
1) व्यष्टी अर्थशास्त्र
2) समष्टी अर्थशास्त्र
3) उदारमतवादी अर्थशास्त्र
4) सामाजिक अर्थशास्त्र
उत्तर : 2) समष्टी अर्थशास्त्र
स्पष्टीकरण : अर्थशास्त्राची समष्टी अर्थशास्त्र शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्चयांशी संबंधित आहे. समष्टी अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची शाखा आहे ज्यामुळे एकूण अर्थशास्त्राच्या संदर्भात एकत्रित विश्लेषण केले जाते.

प्रश्न 17: 1949 मध्ये संमत झालेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत ?
1) 295
2) 355
3) 495
4) 395
उत्तर : 4) 395
स्पष्टीकरण : राज्यघटनेच्या मूळ मजकुरात 22 व 8 अनुसूची भाग आहेत आणि 395 अनुच्छेद आहेत.
26 जानेवारी 1950 रोजी भारत दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. सध्या राज्यघटनेत 25 भाग, 469 कलमे व 12 अनुसूची असून भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे.

प्रश्न 18: पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहेत ?
1) अनुच्छेद 6
2) अनुच्छेद 8
3) अनुच्छेद 7
4) अनुच्छेद 5
उत्तर : 1) अनुच्छेद 6
स्पष्टीकरण : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीच्या वेळी पाकिस्तान मधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबद्दल घटनेच्या अनुच्छेद सहा मध्ये सांगितले आहे. फाळणीची तारीख ही 19 जुलै 1948 होती.

प्रश्न 19: मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वातप्रणाली आहे, ज्यांच्या …………. मध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळते.
1) दिशा
2) उंची
3) परिमाण
4) प्रवाह
उत्तर : 1) दिशा
स्पष्टीकरण : मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वातप्रणाली आहे. ज्यांच्या दिशांमध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळते. उष्ण कटिबंधीय मान्सून हवामानात एकतर उष्णकटिबंधीय सवाना हवामानापेक्षा जास्त पाऊस पडतो किंवा कमी पाऊस व कोरडा ऋतू असतो.

प्रश्न 20: खालीलपैकी कोणता आर्थिक, कर्षण घटक (Pull Factor) स्थलांतरास कारणीभूत नाही ?
1) सुपीक मृदा
2) औद्योगिकीकरणाची निम्न पातळी
3) खनिजांची उपलब्धता
4) रोजगारांच्या अधिक संधी
उत्तर : 2) औद्योगिकीकरणाची निम्न पातळी
स्पष्टीकरण : नवीन ठिकाणी स्थानिक होण्यासाठी लोकांना आकर्षित करणारे घटक ‘पुल फॅक्टर’ असे म्हणतात.
सुपीक मृदा, खनिजांची उपलब्धता आणि रोजगारांच्या अधिक संधी आर्थिक कर्षण घटक स्थलांतरास कारणीभूत आहेत.


Vanrakshak Bharti 2025 Question Paper 04 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 04

https://youtu.be/GCsRtIpHTsM?si=2fAIgcjT0UGi14pv

Leave a Comment