Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 03

Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 03

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 साठी TCS Pattern नुसार विचारलेले महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत.  या पोस्टमध्ये घेतलेले सर्व प्रश्न वनरक्षक भरती 2023 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत.

Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 03

प्रश्न 1: जागतिक प्राणी सुरक्षा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 29 सप्टेंबर
2) 4 ऑक्टोबर
3) 15 मार्च
4) यापैकी नाही
उत्तर : 2) 4 ऑक्टोबर
4 ऑक्टोबर – जागतिक प्राणी सुरक्षा दिन
29 सप्टेंबर – जागतिक हृदय दिन
15 मार्च – जागतिक ग्राहक दिन

प्रश्न 2: आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात, ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाण-घेवाण होत असे ?
1) वस्तू विनिमय प्रणाली
2) निर्यात
3) गुलामांचा व्यापार
4) आयात
उत्तर : 1) वस्तू विनिमय प्रणाली
आदीम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला वस्तू विनिमय प्रणाली असे म्हणतात,ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाण-घेवाण होत असे. प्राचीन काळी व्यापारी एक वस्तू विनिमय प्रणाली म्हणून सुरू झाला ज्यामध्ये लोक वस्तूची दुसऱ्या वस्तूसाठी देवाण-घेवाण करतात. काही आदिम समाज चलन म्हणून शेल आणि मोती वापरतात.

प्रश्न 3: दमणगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत उगम पावते ?
1) पारसनाथ पर्वतरांगा
2) गुरुशिखर
3) सह्याद्री पर्वतरांगा
4) पटकाई बम
उत्तर : 3) सह्याद्री पर्वतरांगा
दमणगंगा नदी सह्याद्री पर्वत रांगेत उगम पावते. दमणगंगा ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी एक नदी आहे.
ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. दमणगंगा नदीला दावण नदी देखील म्हणतात ही पश्चिम भागातील एक नदी आहे.

प्रश्न 4: भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे ?
1) भाग 5
2) भाग 6
3) भाग 6A
4) भाग 4A
उत्तर : 4) भाग 4A
भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे. स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख अनुच्छेद 51A मध्ये करण्यात आला आहे.

प्रश्न 5: भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोण करते ?
1) भारताचे राष्ट्रपती
2) राज्यसभेचे सदस्य
3) लोकसभेचे सदस्य
4) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य
उत्तर : 4) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य
भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य करतात. भारतीय संविधानातील अनुच्छेद 66 उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल माहिती देते. अनुच्छेद 63 नुसार भारताचा उपराष्ट्रपती असला पाहिजे. अनुच्छेद 66 (1) नुसार उपराष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून निवडले जातात.

प्रश्न 6: 2023 च्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली होती ?
1) लक्षद्वीप
2) महाराष्ट्र
3) उत्तराखंड
4) जम्मू आणि काश्मीर
उत्तर : 4) जम्मू आणि काश्मीर
हिवाळी खेलो इंडिया गेम्स 2023 :
ठिकाण – गुलमर्ग (जम्मू काश्मीर)
कालावधी – 14 फेब्रुवारी 2023

प्रश्न 7: ज्योतीराव गोविंदराव फुले यांनी 1873 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या …………. या पुस्तकात, ब्राह्मणी वर्चस्वाखालील शूद्रांच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचे सविस्तर वर्णन केले आणि त्यांची तुलना अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या गुलामगिरीशी केली.
1) सत्यशोधक
2) शेतकऱ्याचा आसूड
3) वर्णाश्रम
4) गुलामगिरी
उत्तर : 4) गुलामगिरी

Talathi Bharti 2025 Question Paper 05

प्रश्न 8: खालीलपैकी कोणत्या IIT संस्थेने रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘संजय’ हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे ?
1) आयआयटी मद्रास
2) आयआयटी मुंबई
3) आयआयटी कानपूर
4) आयआयटी खरगपूर
उत्तर : 1) आयआयटी मद्रास
आयटी मद्रासचे संजय हे प्लॅटफॉर्म रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारी संस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय पायाभूत सुविधांना मदत करू शकते.

प्रश्न 9: राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळतो ?
1) पंतप्रधान
2) मुख्य निवडणूक आयुक्त
3) लोकसभेचे अध्यक्ष
4) भारताचे मुख्य न्यायमूर्ती
उत्तर : 4) भारताचे मुख्य न्यायमूर्ती
राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांच्या परवानगीने कारभार पाहतात. राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पुढील उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती राष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत भारताचे सरन्यायाधीश भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.

प्रश्न 10: व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला काय म्हटले जाते ?
1) गुंतवणूक
2) राखीव भांडवल गुणोत्तर
3) कर्ज
4) राखीव ठेव गुणोत्तर
उत्तर : 4) राखीव ठेव गुणोत्तर
व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला राखीव ठेव गुणोत्तर असे म्हटले जाते.
राखीव प्रमाण हे रोख राखीव प्रमाण अर्थात कॅश रिजर्व रेशो म्हणूनही ओळखले जाते. ही ठेवींची निर्धारित टक्केवारी आहे जी व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकेच्या निर्देशानुसार तिच्याकडे राखीव स्वरूपात ठेवणे आवश्यक आहे.

प्रश्न 11: कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे आणि 2045 पर्यंत मंगळावर उतरण्याची योजना आखली आहे ?
1) मॉरिशस
2) दक्षिण कोरिया
3) मलेशिया
4) सिंगापूर
उत्तर : 2) दक्षिण कोरिया

प्रश्न 12: सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत ?
1) अनुच्छेद 22-23
2) अनुच्छेद 23-24
3) अनुच्छेद 29-30
4) अनुच्छेद 19-22
उत्तर : 3) अनुच्छेद 29-30
सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 29-30 शी संबंधित आहे.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 29 अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधाच्या संरक्षणाची हमी देते, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार समाविष्ट आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 30 अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देतो.

प्रश्न 13: विशिष्ट कालावधीत, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला, त्या क्षेत्रातील हजारच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास …………. म्हणतात.
1) मृत्युदर
2) मृतजन्म
3) जन्मदर
4) जिवंत जन्म
उत्तर : 3) जन्मदर
विशिष्ट कालावधीत, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला, त्या क्षेत्रातील हजारच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास जन्मदर म्हणतात. एका वर्षात दर हजार व्यक्ती मागे जिवंत व्यक्तींची संख्या म्हणजे जन्मदर.

प्रश्न 14: अंगामी ही …………. राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे.
1) नागालँड
2) तामिळनाडू
3) हिमाचल प्रदेश
4) पंजाब
उत्तर : 1) नागालँड
अंगामी ही नागालँड राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे. ही नागा समाजाची एक शाखा आहे.
अंगामी परंपरेने अंगामी भाषा त्यांची मातृभाषा म्हणून वापरतात. ते नागालँडच्या कोहिमा जिल्हा आणि दिसपूर जिल्ह्यात आणि शेजारच्या मणिपूर राज्यात राहतात.

प्रश्न 15: ‘मेगन’ हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते ?
1) इंडोनेशिया
2) ऑस्ट्रेलिया
3) मादागास्कर
4) पाकिस्तान
उत्तर : 2) ऑस्ट्रेलिया
18 मार्च 2024 रोजी ऑस्ट्रेलियातील कार्पेन्टेरिया खाडीच्या किनारपट्टीवर मेगन हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आले होते.

प्रश्न 16: स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 2014 साली कोणत्या जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केले ?
1) अकोला
2) बीड
3) बुलढाणा
4) चंद्रपूर
उत्तर : 4) चंद्रपूर
स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 2014 साली चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. विदर्भातील जंगल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूवर आधारित उद्योगांच्या स्थापनेसाठी आदिवासी ग्रामीण बांधवांना असलेली प्रशिक्षणाची निकड भागविण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र उभारले गेले होते.

प्रश्न 17: स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते ………… यांचे शिष्य बनले.
1) स्वामी विवेकानंद
2) स्वामी विराजानंद
3) ईश्वरचंद्र विद्यासागर
4) राजा राममोहन रॉय
उत्तर : 2) स्वामी विराजानंद
स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि ते शेवटी स्वामी विराजानंद यांचे शिष्य बनले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली.

प्रश्न 18: ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली ?
1) 31 मार्च 1955
2) 22 नोव्हेंबर 1975
3) 20 मार्च 1958
4) 22 एप्रिल 1927
उत्तर : 1) 31 मार्च 1955
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे मध्यप्रदेश सरकारने स्थापन केले होते, परंतु 1960 च्या नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी ते महाराष्ट्रात आले. ताडोबा हे नाव ताडोबा देव या गोंडजमातीचा कुलदैवतावरून पडले आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 116.55 चौ.किमी आहे.

प्रश्न 19: महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील ………… गटांच्या सहभागाची साक्ष देतो.
1) मराठा
2) ब्राह्मण
3) महिला
4) आदिवासी
उत्तर : 4) आदिवासी
धुळे जिल्हा हा पूर्वी खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी/खानदेशी भाषेचे माहेरघर आहे. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो.

प्रश्न 20: खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर होते ?
1) कालीबंगन
2) सुजानगढ
3) हनुमानगड
4) लोथल
उत्तर : 4) लोथल
लोथल हे सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर होते. लोथल हे गुजरात राज्यातील पुरातत्वीय अवशेषांचे एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ देखील होते. लोथल याच शहराला मिनी हडप्पा म्हणून देखील ओळखले जाते.


Vanrakshak Bharti 2025 Question Paper 03 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 03

Leave a Comment