Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 02
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 Question Paper साठी TCS Pattern नुसार विचारलेले महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. या पोस्टमध्ये घेतलेले सर्व प्रश्न वनरक्षक भरती 2023 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत.

प्रश्न 1: सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाजवळ होतो ?
1) बियास कुंड
2) राकस तलाव
3) मानसरोवर
4) ब्रह्मगिरी पर्वत
उत्तर : 2) राकस तलाव
स्पष्टीकरण : सतलज नदीचा उगम राकच तलावाजवळ होतो. आणि सतलज नदीची लांबी 1050 km इतकी आहे.
प्रश्न 2: कोणत्या वर्षी, भारतातील गरिबीच्या आकलनाच्या पद्धतीशास्त्राचे पुनरावलोकन करण्यासाठी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ गटांची स्थापना करण्यात आली होती ?
1) 2003 साली
2) 2001 साली
3) 2008 साली
4) 2005 साली
उत्तर : 4) 2005 साली
प्रश्न 3: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध ………… दरम्यान लढले गेले.
1) 1762 ते 1764
2) 1780 ते 1782
3) 1803 ते 1805
4) वरीलपैकी नाही
उत्तर : 3) 1803 ते 1805
स्पष्टीकरण : दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात 1803-05 यादरम्यान युद्ध झाले. लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण होते.
प्रश्न 4: ‘सत्यार्थ प्रकाश’ (सत्याचा प्रकाश) ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे ?
1) ईश्वरचंद्र विद्यासागर
2) स्वामी विवेकानंद
3) रामकृष्ण परमहंस
4) स्वामी दयानंद सरस्वती
उत्तर : 4) स्वामी दयानंद सरस्वती
स्पष्टीकरण : सत्यार्थ प्रकाश आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले पुस्तक आहे.
हे पुस्तक सर्वात पहिल्यांदा 1875 मध्ये हिंदीत लिहिले गेले. सन 1882 मध्ये दयानंद सरस्वतीने त्याची दुसरी आवृत्ती लिहिली. हे पुस्तक संस्कृत सह वीस भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली.
प्रश्न 5: द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदीचे खोरे कोणते आहे, जय महाराष्ट्र सह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे ?
1) तापी खोरे
2) कृष्णा खोरे
3) नर्मदा खोरे
4) गोदावरी खोरे
उत्तर : 4) गोदावरी खोरे
स्पष्टीकरण : द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदीचे खोरे गोदावरी नदी खोरे आहे, जे महाराष्ट्रसह भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिणगंगा असेही म्हणतात. गोदावरी नदीची लांबी 1450 km इतकी आहे. गोदावरीचा उगम नाशिक जवळ त्रंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो.
प्रश्न 6: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संकटात सापडलेल्या कोणत्या पक्षाला वाचाविण्यासाठी आपली रणनीती उघड करण्याच्या आवाहन केले ?
1) गिधाड
2) माळढोक
3) सायबेरियन बगळा
4) घुबड
उत्तर : 2) माळढोक
स्पष्टीकरण : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संकटात सापडलेल्या ग्रेट इंडियन बस्टर्ड (माळढोक) या पक्षाला वाचवण्यासाठी आपली रणनीती उघड करण्याचे आवाहन केले. राजस्थानच्या थारच्या वाळवंटात फक्त 100 ते 150 माळढोक शिल्लक असून हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
प्रश्न 7: …………. 2023 रोजी, लोकसभेत जैवविविधता सुधारणा विधेयक 2021 मंजूर करण्यात आले.
1) 25 एप्रिल
2) 25 जुलै
3) 5 मार्च
4) 5 जून
उत्तर : 2) 25 जुलै
स्पष्टीकरण : 25 जुलै 2023 रोजी लोकसभेत जैवविविधता सुधारणा विधेयक 2021 मंजूर करण्यात आले.
भारतातील शाश्वत जैवविविधता संवर्धन आणि उपयोगाला समर्थन देता सध्याच्या गरजा आणि घडामोडींच्या अनुषंगाने कायद्याचे संरेखन करण्यासाठी या सुधारणांची रचना करण्यात आली आहे.
प्रश्न 8: लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. केसरी कोणत्या भाषेत प्रकाशित केले गेले होते ?
1) हिंदी
2) गुजराती
3) इंग्रजी
4) मराठी
उत्तर : 4) मराठी
स्पष्टीकरण : लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्र प्रकाशित केली होती. केसरी मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आलेले वृत्तपत्र होते. केसरीचे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 पर्यंत काम केले. केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र होते.
प्रश्न 9: धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
1) 1893 साली
2) 1898 साली
3) 1896 साली
4) 1890 साली
उत्तर : 1) 1893 साली
स्पष्टीकरण : धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना 1893 साली केली. धोंडो केशव कर्वे यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षाचे जीवन वाहिले. 1907 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.
प्रश्न 10: महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो ?
1) दक्षिण महाराष्ट्र
2) पश्चिम घाट
3) कोकण समुद्रकिनारा
4) दख्खनचे पठार
उत्तर : 4) दख्खनचे पठार
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील दख्खनचे पठार हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो. महाराष्ट्राचे पठार हे मुख्यतः अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 75 टक्के भागात रेगूर मृदा पसरलेले असून दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 86 टक्के भाग व्यापला आहे.
प्रश्न 11: ‘माउंट एरेबस’ हा कोणत्या खंडातील सर्वोच्च सक्रिय ज्वालामुखी आहे ?
1) आशिया खंड
2) आफ्रिका खंड
3) युरोप खंड
4) अंटार्क्टिका खंड
उत्तर : 4) अंटार्क्टिका खंड
स्पष्टीकरण : अंटार्टिकातील सर्वोच्च सक्रिय ज्वालामुखी ‘माउंट एरेबस’ दररोज अंदाजे 80 ग्राम क्रिस्टलाईज्ड सोने बाहेर टाकत आहे. हा ज्वालामुखी रोज बेटावर असून त्याला ‘एचएमएस एरेबस’ हे नाव देण्यात आले आहे.
प्रश्न 12: फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने तयार केलेला इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो ?
1) प्रत्येकी दोन वर्षांनी
2) प्रत्येकी सहा वर्षांनी
3) प्रत्येकी पाच वर्षांनी
4) प्रत्येकी चार वर्षांनी
उत्तर : 1) प्रत्येकी दोन वर्षांनी
स्पष्टीकरण : फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने तयार केलेला इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो. पहिले सर्वेक्षण 1987 मध्ये प्रसिद्ध झाले होते आणि ते आता दर दोन वर्षांनी प्रकाशित केले जातात.
प्रश्न 13: बाळ गंगाधर टिळकांनी खालीलपैकी कोणता नारा दिला होता ?
1) क्रांती चिरंजीवी होवो
2) इन्कलाब जिंदाबाद
3) जय हिंद
4) स्वातंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच
उत्तर : 4) स्वातंत्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच
प्रश्न 14: …………… राज्यांतून जाणारा दक्षिण-पश्चिम घाट 7000 चौ.किमीचे क्षेत्रफळ व्यापतो आणि फुले व प्राण्यांच्या जैवविविधतेने अतिशय समृद्ध आहे.
1) कर्नाटक आणि केरळ
2) कर्नाटक आणि महाराष्ट्र
3) तेलंगणा आणि तामिळनाडू
4) केरळ आणि तामिळनाडू
उत्तर : 4) केरळ आणि तामिळनाडू
स्पष्टीकरण : पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना व्यापून 1600 किमी पसरलेल्या आहेत.
प्रश्न 15: संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती ?
1) 9 डिसेंबर 1946
2) 10 डिसेंबर 1948
3) 1 नोव्हेंबर 1945
4) 9 डिसेंबर 1945
उत्तर : 1) 9 डिसेंबर 1946
स्पष्टीकरण : 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीत सर्वप्रथम संविधान सभेची बैठक झाली आणि त्याचे शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1925 रोजी झाले. 1947 मध्ये भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले. भारतासाठी संविधान सभा बनवण्याची कल्पना सर्वप्रथम 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती.
प्रश्न 16: खालीलपैकी कोण हे बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे पहिले भारतीय होते ?
1) देवेंद्रनाथ टागोर
2) सहजानंद सरस्वती
3) अरुणा असफ अली
4) बदरुद्दीन तय्यबजी
उत्तर : 4) बदरुद्दीन तय्यबजी
स्पष्टीकरण : बदरूद्दीन तय्यबजी हे ब्रिटिश राजवटीतील एक भारतीय वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि राजकारणी होते. इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले आणि ते पहिले भारतीय होते. ते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले बॅरिस्टर भारतीय न्यायाधीश होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष देखील होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. त्यांनी 1987 च्या मद्रासी येथील अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भूषवले होते.
प्रश्न 17: खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर होते ?
1) कालीबंगन
2) सुजानगड
3) लोथल
4) हनुमान गड
उत्तर : 3) लोथल
स्पष्टीकरण : लोथल हे शहर सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर होते. लोथल हे गुजरात राज्यातील पुरातत्वीय अवशेषांचे एक प्रसिद्ध प्राचार्य स्थळ आहे. हे शहर इ.स.पू 2400 जुने आहे आणि हे भारताच्या गुजरात राज्यातील भाल प्रदेशात आहे आणि 1954 साली ते शोधले गेले होते. लोथल या शहराला मिनी हडप्पा म्हणून ओळखले जाते.
प्रश्न 18: महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य कोणते आहे ?
1) पठारी स्वरूप
2) समुद्रतटीय मैदाने
3) डोंगर रांगा
4) घनदाट जंगले
उत्तर : 1) पठारी स्वरूप
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील प्रभावी प्राकृतिक वैशिष्ट्य पठारी स्वरूप आहे. पठारी प्रदेशात मैदानासारखे सपाट भाग व उंच सखल भागही थोडेसे असतात. त्यामुळे पठार हे एक वैशिष्ट्यपूर्ण भूमी स्वरूप म्हणून ओळखले जाते.
पठारी प्रदेशाची उंची सामान्यतः 300 ते 900 मीटर पर्यंत आढळते.
प्रश्न 19: भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये 11 व्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला ?
1) 92 वी घटनादुरुस्ती
2) 73 वी घटनादुरुस्ती
3) 86 वी घटनादुरुस्ती
4) 42 वी घटनादुरुस्ती
उत्तर : 3) 86 वी घटनादुरुस्ती
स्पष्टीकरण : भारतीय राज्यघटनेच्या 86 वी घटनादुरुस्तीमध्ये 11 व्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
प्रश्न 20: भारतातील शासकीय उपक्रमांच्या बाबतीत भारतीय रेल्वेची स्थिती काय आहे ?
1) सर्वात लहान
2) सर्वाधिक मोठा
3) तिसरा सर्वाधिक मोठा
4) चौथा सर्वाधिक मोठा
उत्तर : 2) सर्वाधिक मोठा
स्पष्टीकरण : भारतीय रेल्वे हा भारतातील सर्वात मोठा शासकीय उपक्रम आहे. भारतीय रेल्वे ही भारत सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतातील रेल्वे मार्गांची लांबी जवळपास 67,415 किमी आहे. रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्यांचे नियोजन करतो.
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 02 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 02