Vanrakshak Bharti 2025 Question Paper 01 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 01
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये Vanrakshak Bharti 2025 Question Paper साठी TCS Pattern नुसार विचारलेले महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. या पोस्टमध्ये घेतलेले सर्व प्रश्न वनरक्षक भरती 2023 या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत.

प्रश्न 1: 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला …………. कारखाना उभारला गेला.
1) डॅनिश
2) फ्रेंच
3) इंग्रज
4) डच
उत्तर : 3) इंग्रज
स्पष्टीकरण : 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना इंग्रजांनी उभारला होता.
प्रश्न 2: खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते ?
1) गोदावरी नदी
2) ब्रह्मपुत्रा नदी
3) पेन्ना नदी
4) कृष्णा नदी
उत्तर : 2) ब्रह्मपुत्रा नदी
स्पष्टीकरण : ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयातील सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते. ब्रह्मपुत्रा ही आशियातील एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वत रांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो या नावाने उगम पावते. तिथून पूर्वेकडे वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाम मधून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये शिरते. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी सुमारे 2900 km आहे.
प्रश्न 3: 21 डिसेंबर 1909 रोजी, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या सोबतीने खालीलपैकी कोणी, नाशिकचे न्यायदंडाधिकारी अर्थ जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या केली ?
1) लहुजी वस्ताद साळवे
2) चाफेकर बंधू
3) बायजाबाई
4) कृष्णाजी गोपाळ कर्वे
उत्तर : 4) कृष्णाजी गोपाळ कर्वे
प्रश्न 4: प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ?
1) उत्तराखंड
2) मध्यप्रदेश
3) महाराष्ट्र
4) आसाम
उत्तर : 1) उत्तराखंड
स्पष्टीकरण : भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते.
प्रश्न 5: उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात ?
1) उन्नाव
2) आग्रा
3) मिर्झापूर
4) सुलतानपूर
उत्तर : 3) मिर्झापूर
स्पष्टीकरण : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात. या लोकात शासन व्यवस्थेची रीतसर पद्धत नसते. मिर्झापूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
प्रश्न 6: भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘न्याय’ यासंदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे ?
1) सार्वभौम
2) धर्मनिरपेक्ष
3) आर्थिक
4) समाजवादी
उत्तर : 3) आर्थिक
स्पष्टीकरण : प्रस्ताविकेत न्यायाची तीन स्वरूपे स्पष्ट करण्यात आली आहेत.
सामाजिक न्याय : म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इ. सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल.
आर्थिक न्याय : उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे
राजकीय न्याय : सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश होतो.
प्रश्न 7: अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी खालीलपैकी कोणी केली ?
1) पृथ्वीराज चौहान
2) महादेव भिक्षू
3) कुशान राजा कनिष्क
4) के के मोहम्मद
उत्तर : 2) महादेव भिक्षू
स्पष्टीकरण : अमरावती स्तूप हा अमरावती, पालनाडू जिल्हा आंध्र प्रदेश या भागातील एक उध्वस्त बौद्ध स्तूप आहे.
अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी महादेव भिक्षू यांनी केली. अमरावती स्तूप बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी एक अतिशय महत्त्वाचे स्मारक आहे.
प्रश्न 8: परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो ?
1) तामिळनाडू
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) पंजाब
उत्तर : 1) तामिळनाडू
प्रश्न 9: खालीलपैकी कोणत्या पाच नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात ?
1) कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकण क्षेत्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या
2) मिंधोळा, पूर्णा, अंबिका, वांकी आणि औरंगा
3) महेंद्रतनया, तापी, नर्मदा, पंपा आणि बहुदा
4) कृष्णा, गोदावरी, सुवर्णरेखा, ब्राह्मणी आणि महानदी
उत्तर : 1) कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकण क्षेत्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या
प्रश्न 10: खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे ?
1) गवळदेव
2) कळसुबाई
3) साल्हेर
4) नाणेघाट
उत्तर : 2) कळसुबाई
स्पष्टीकरण : कळसुबाई हे अकोले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे सर्वोच्च पर्वत शिखर आहे.
उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाई शिखरांची उंची 1646 मीटर आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसुबाई शिखर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे.
प्रश्न 11: विश्वभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली आहे ?
1) सत्येंद्रनाथ टागोर
2) द्वारकादासनाथ टागोर
3) राजा राममोहन रॉय
4) रवींद्रनाथ टागोर
उत्तर : 4) रवींद्रनाथ टागोर
स्पष्टीकरण : विश्व भारती विद्यापीठ स्थापना : 23 डिसेंबर 1921
संस्थापक – रवींद्रनाथ टागोर
उद्देश – भारतीय शिक्षणाची बीजे रोवण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
कुलपती – भारताचे पंतप्रधान असतात.
प्रश्न 12: भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 11 व्या मूलभूत कर्तव्याचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला ?
1) 88 व्या घटनादुरुस्ती कायदा 2002
2) 89 वा घटनादुरुस्ती कायदा 2001
3) 76 वा घटनादुरुस्ती कायदा 2008
4) 86 वा घटनादुरुस्ती कायदा 2002
उत्तर : 4) 86 वा घटनादुरुस्ती कायदा 2002
स्पष्टीकरण : भारतीय राज्यघटनेतील 86 वा घटनादुरुस्ती कायदा 2002 या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 11 व्या मूलभूत कर्तव्याचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला. सन 2002 मध्ये भारतीय राज्यघटनेतील 86 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाचा अधिकार प्रदान केला. सहा ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनणारा एक नवीन अनुच्छेद 21A जोडला गेला.
प्रश्न 13: खालीलपैकी कोणती रिफायनरी (शुद्धीकरण कारखाना) ही भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाम मध्ये आहे ?
1) दिग्बोई रिफायनरी
2) जामनगर रिफायनरी
3) गुवाहाटी रिफायनरी
4) कोची रिफायनरी
उत्तर : 1) दिग्बोई रिफायनरी
स्पष्टीकरण : दिग्बोई रिफायनरी ही भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाममध्ये आहे.
सन 1901 मध्ये दिग्बोई ही भारतातील पहिली ऑइल रिफायनरी सुरू करण्यात आली होती. रिफायनरी मध्ये क्रुड तेलाचे रूपांतर पेट्रोलमध्ये केले जाते. दिग्बोई मध्ये सापडलेली तेल विहीर ही सर्वात जुनी आणि आजही वापरात असलेली तेल विहीर आहे.
प्रश्न 14: ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता, ज्यानुसार इम्पिरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणतेही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळाला होता ?
1) 1919 चा रौलेट कायदा
2) 1793 चा सनदी कायदा
3) 1813 चा सनदी कायदा
4) 1784 चा पिट्स इंडिया कायदा
उत्तर : 1) 1919 चा रौलेट कायदा
प्रश्न 15: भारताचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?
1) भारताचे पंतप्रधान
2) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश
3) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समूह
4) भारताचे राष्ट्रपती
उत्तर : 4) भारताचे राष्ट्रपती
स्पष्टीकरण : भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद आहे.
सर न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती संविधानाच्या अनुच्छेद 124 च्या कलम (2) अंतर्गत करतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.
प्रश्न 16: भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे ?
1) अनुच्छेद 343
2) अनुच्छेद 218
3) अनुच्छेद 132
4) अनुच्छेद 368
उत्तर : 1) अनुच्छेद 343
स्पष्टीकरण : अनुच्छेद 132 – विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारीता
अनुच्छेद 218 – सर्वोच्च न्यायालय संबंधित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असणे
अनुच्छेद 343 – संघराज्यांची भाषा
अनुच्छेद 368 – घटना दुरुस्ती
प्रश्न 17: पहिले अँग्लो – अफगान युद्ध केव्हा झाले ?
1) 1804 – 1805
2) 1839 – 1842
3) 1794 – 1802
4) 1849 – 1850
उत्तर : 2) 1839 – 1842
स्पष्टीकरण : इंग्रज अफगान युद्धे ही इंग्रजांनी अफगाणिस्तानात स्वतःची किंवा आपल्या अंकितांची सत्ता स्थापन करण्यासाठी केलेली युद्ध होती. पहिले अँग्लो अफगान युद्ध 1839-42 मध्ये झाले. हे ब्रिटिश साम्राज्य आणि काबूलच्या अमीराती यांच्यात 1839 ते 1842 पर्यंत लढले गेले.
प्रश्न 18: महाराष्ट्र राज्याला सुमारे …………. लांबीची खाचखळगेयुक्त किनारपट्टी आहे, जी प्रमुख नदी मुखे आणि अरुंद खाड्यांनी दर्शविले जाते.
1) 200 किमी
2) 720 किमी
3) 1700 किमी
4) 900 किमी
उत्तर : 2) 720 किमी
स्पष्टीकरण : महाराष्ट्र राज्याला सुमारे 720 km ची किनारपट्टी लाभलेली आहे. महाराष्ट्र किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून देखील ओळखली जाते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग ही किनारपट्टी असलेली महत्त्वाचे जिल्हे आहेत.
प्रश्न 19: ‘झेलम नदी’ भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते ?
1) जम्मू आणि काश्मीर
2) अंदमान आणि निकोबार बेटे
3) लक्षद्वीप
4) दादरा नगर हवेली
उत्तर : 1) जम्मू आणि काश्मीर
स्पष्टीकरण : झेलम ही पंजाब मधील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला येऊन मिळते.
झेलम नदी उत्तर भारतातील एक महत्त्वाची नदी आहे. झेलम नदी वेरीनाग येथे उगम पावते आणि जम्मू आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून वाहते.
प्रश्न 20: ‘पारादिप बंदर’ हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ………….. राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे.
1) कर्नाटक
2) ओडिशा
3) पश्चिम बंगाल
4) महाराष्ट्र
उत्तर : 2) ओडिशा
स्पष्टीकरण : पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे.
पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक नैसर्गिक खोल पाण्याचे बंदर आहे. पारादीप बंदराची पायाभरणी 3 जानेवारी 1962 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली होती.
Vanrakshak Bharti 2025 Question Paper 01 | वनरक्षक भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 01