TCS Pattern Exams Special Books 2025 | TCS पॅटर्ननुसार परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तके | TCS Pattern

TCS Pattern Exams Special Books 2025 | TCS पॅटर्ननुसार परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तके | TCS Pattern

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCS Pattern या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.

मित्रांनो सध्याचे युग म्हणजे स्पर्धेचे युग आहे कारण आज 10 पैकी 8 विद्यार्थी हे सरकारी नोकरी मिळावी म्हणून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. कारण सर्वांना माहित आहे की सरकारी नोकरी म्हणजे जीवन सुरक्षा असल्यासारखं वाटतं. पण सध्याची परिस्थिती खूप अवघड होत चालली आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे आणि प्रत्येकाला यश मिळवणे अवघड आहे.

कारण महाराष्ट्र सरकारने मागील 2 ते तीन वर्षापासून काही महत्त्वाच्या परीक्षा TCS आणि IBPS यांच्याकडे सोपवल्या आहेत. एक प्रकारे आपण म्हणू शकतो की, त्यावेळी अभ्यासक्रम थोडासा सोपा होता पण जेव्हापासून TCS व IBPS पॅटर्न आला आहे तेव्हापासून परीक्षा अवघड होत चालली आहे.

TCS Pattern Exams Special Books 2025
TCS Pattern Exams Special Books 2025 | TCS पॅटर्ननुसार परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तके | TCS Pattern

TCS Pattern द्वारे काही महत्त्वाच्या परीक्षा घेतल्या जातात, त्यामध्ये तलाठी भरती, वनरक्षक भरती, मुंबई महानगरपालिका भरती, म्हाडा भरती इ. परीक्षा या TCS Pattern नुसार घेतल्या जातात. आणि परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडतो की, कोणती पुस्तके महत्त्वाचे आहेत ? TCS पॅटर्ननुसार अभ्यासक्रम घेणारे खूप कमी पुस्तकं सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत TCS Pattern महत्त्वाचे असणारे 4 पुस्तके जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप मदत होईल.

1) महाराष्ट्र वनविभाग (वनरक्षक भरती)

2019 साली वनरक्षक भरती ही महाराष्ट्र वनविभागाद्वारे घेतली होती व 2023 साली हीच परीक्षा TCS ने घेतली होती. 2023 पासून वार्षिक भरती ही TCS पॅटर्नच घेत आहे. त्यामुळे वनरक्षक भरती 2025 साठी खूप महत्त्वाचे IMP असणारे पुस्तक आहे.

TCS Pattern Exams Special Books 2025

वैशिष्ट्ये :
✅ TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
✅ महाराष्ट्र शासनातर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या एकूण 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
✅ या पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे.
✅ TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये देण्यात आले आहे.
✅ TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबंधीत) एकूण 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
✅ TCS Pattern द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षण पेक्षा जास्त आहे.
✅ आगामी होणाऱ्या वनविभाग (वनसेवक, वनमजूर, वनरक्षक) परीक्षांसाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे असणार आहे.


 

2) TCS Pattern प्रश्नपत्रिका (वर्गीकरण व विश्लेषण)

हे पुस्तक TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी एकदम खास पुस्तक असणार आहे. करण्या पुस्तकात TCS ने घेतलेल्या विविध परीक्षांचे संपूर्ण प्रश्न व त्यांचे स्पष्टीकरण घेतलेले आहे.

TCS Pattern Exams Special Books 2025

वैशिष्ट्ये :
✅ 2022 व 2023 या दोन वर्षात जेवढ्या महत्त्वाच्या परीक्षा झालेल्या आहेत जसे की, म्हाडा भरती, WRD भरती, ITI भरती, DVET भरती, TPA भरती, DMER भरती, PCMC भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांचे स्पष्टीकरण घेण्यात आलेले आहे.
✅ या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात विषयानुसार मांडणी करण्यात आलेली आहे.


 

3) TCS पॅटर्न (तलाठी भरती स्पेशल प्रश्नसंच)

बी पब्लिकेशन यांच्याद्वारे प्रकाशित असणारे हे पुस्तक आपल्याला तलाठी भरतीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

TCS Pattern Exams Special Books 2025

वैशिष्ट्ये :
✅ या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे की, या एकाच पुस्तकामध्ये तलाठी भरती 2023 मध्ये TCS पॅटर्ननुसार घेण्यात आलेल्या सर्व 57 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत.
✅ मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित व बुद्धिमापन या चारही विषयांचे वर्गीकरण करून संपूर्ण स्पष्टीकरण असे प्रश्नोत्तरे घेतलेले आहेत.
✅ TCS Pattern तलाठी भरती ठोकळा प्रश्नसंच आहे हे पुस्तक.


 

4) चालू घडामोडी डायरी (Simplified Publications)

बालाजी सुरणे लिखित व Simplified Publication यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेले संपूर्ण वर्षाचे चालू घडामोडी डायरी खूप महत्त्वाचे आहे. कारण कोणतीही परीक्षा असेल तर त्यामध्ये चालू घडामोडी (Current Affairs) हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो.

TCS Pattern Exams Special Books 2025

वैशिष्ट्ये :
✅ MPSC, राज्यसेवा, संयुक्त गट ब, गट क, पोलीस भरती व TCS पॅटर्न परीक्षा या सर्वांसाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे.
✅ प्रत्येक प्रश्नाचे संदर्भ व स्पष्टीकरण एकदम सोप्या भाषेत घेतलेले आहे.
या पुस्तकांमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत ?
✅ राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, अहवाल व निर्देशांक, कृषी व पर्यावरण घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी, संरक्षण घडामोडी, अंतरिक्ष घडामोडी, प्रमुख नेमणुका, निधन वार्ता, क्रीडा पुरस्कार, महत्त्वाचे दिनविशेष, महत्त्वाचे पुरस्कार, शासकीय योजना व उपक्रम, प्रादेशिक घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, महोत्सव व परिषदा, चर्चेतील पुस्तके, महत्त्वाच्या समित्या व आयोग.
✅ चालू घडामोडी (Current Affairs) साठी हे पुस्तक महत्त्वाचे व फायदेशीर ठरू शकते.


TCS Pattern Exams Special Books 2025 | TCS पॅटर्ननुसार परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तके | TCS Pattern

 

Leave a Comment