Talathi Bharti 2025 Question Paper 08 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07 | TCS Question Papers Marathi

Talathi Bharti 2025 Question Paper 08 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 08

नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper 08 साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

Talathi Bharti 2025 Question Paper 08
Talathi Bharti 2025 Question Paper 08 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07 | TCS Question Papers Marathi

प्र 1: निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व/घटक महत्त्वाचे आहे ?
1) जीवनसत्व के
2) लोह
3) जीवनसत्व अ
4) कॅल्शियम
उत्तर: 3) जीवनसत्व अ
स्पष्टीकरण: निरोगी दृष्टीसाठी जीवनसत्व अ महत्त्वाचे आहे. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होत असतो.
रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्या वेळी पाहू शकत नाही.  अ जीवनसत्वामुळे दृष्टी चांगली राहते, हाडांची वाढ होते आणि फुफुसे व रक्त यांचे पोषण होते. या जीवनसत्वामुळे शरीराचे जंतूसंसर्गापासून संरक्षण होते. अ जीवनसत्व हे गाजर, रताळे, टोमॅटो, पालक, दूध, लोणी, आंबा आणि संत्री यामध्ये विपुल प्रमाणात आढळते.

प्र 2: ‘काट्याचा नायटा होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
1) चुकीची कडक शब्दात जाणीव करून देणे
2) निरुपाय होणे
3) पूर्ण दुर्लक्ष करणे
4) साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणे
उत्तर: 4) साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणे
स्पष्टीकरण: वाक्प्रचार व अर्थ :
काट्याचा नायटा होणे – साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणे
समज देणे – चुकीची कडक शब्दात जाणीव करून देणे
पूर्ण दुर्लक्ष करणे – कानाडोळा करणे
निरुपाय होणे – हतबल होणे

प्र 3: संगणकातील इनपुट डिवाइसचे मुख्य कार्य कोणते आहे ?
1) संगणकाला डेटा पुरवणे
2) डेटावर प्रक्रिया करणे
3) संगणकावरून डेटा प्राप्त करणे
4) प्रक्रियेसाठी डेटा संग्रहित करणे
उत्तर: 1) संगणकाला डेटा पुरवणे
स्पष्टीकरण: संगणकातील इनपुट डिवाइसचे मुख्य कार्य संगणकाला डेटा पुरवणे आहे. इनपुट डिवाइस हे एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस असून याचा उपयोग संगणकाला आदेश किंवा माहिती देण्यासाठी केला जातो. ज्या उपकरणांच्या माध्यमातून आपण माहिती संगणकापर्यंत पोहोचवतो त्यास इनपुट डिवाइस असे म्हणतात.

प्र 4: 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते …………… मध्ये ‘प्रधानमंत्री उज्वला योजना’ (PMUY) सुरू करण्यात आली.
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) मध्य प्रदेश
4) उत्तर प्रदेश
उत्तर: 4) उत्तर प्रदेश
स्पष्टीकरण: 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू करण्यात आली.
या योजनेद्वारे भारतातील दारिद्र्यरेषेखालील असलेल्या सुमारे पाच कोटी महिलांना घरगुती एलपीजी गॅस जोडण्यात येणार होता.
ही योजना बीपीएल कुटुंबांना प्रत्येक एलपीजी कनेक्शनसाठी 1600 रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करते.

प्र 5: ‘खेद’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
1) विशद
2) विषारी
3) विषाद
4) विषद
उत्तर: 3) विषाद
स्पष्टीकरण: समानार्थी शब्द :
खेद – वैषम्य, विषाद, खंत
विषारी – जहर, विष

प्र 6: ऑगस्ट 2024 मध्ये भारतातील पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण बनली ?
1) बियांका कश्यप
2) डायना पंडोल
3) ऐश्वर्या पिसे
4) पिप्पा मान
उत्तर: 2) डायना पंडोल
स्पष्टीकरण: पुण्याची रहिवासी असलेली 28 वर्षीय डायना पंडोल कार रेसिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरली आहे. तिने सलून प्रकारात इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे ती दोन मुलांची आई देखील आहे.

Talathi Bharti 2025 Question Paper 05

प्र 7: त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय आहे ?
1) बी
2) माधवानूज
3) गिरीश
4) बालकवी
उत्तर: 4) बालकवी
स्पष्टीकरण: लेखक व त्यांचे टोपण नाव :
बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बी – नारायण मुरलीधर गुप्ते
गिरीश – शंकर केशव कानेटकर
माधवानूज – काशिनाथ हरी मोडक

प्र 8: 42 वा संविधानिक सुधारणा अधिनियम, 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही ?
1) एकात्मता
2) स्वातंत्र्य
3) समाजवादी
4) धर्मनिरपेक्ष
उत्तर: 2) स्वातंत्र्य
स्पष्टीकरण: 42 वा संविधानिक सुधारणा अधिनियम 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले गेले.
या दुरुस्ती अंतर्गत भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य निश्चित करण्यात आली आणि त्यामुळे भारतीय संविधानात सर्वात व्यापक बदल घडवून आणले.

प्र 9: ‘तोंडपाठ’ या समासाचा योग्य विग्रह ओळखा.
1) तोंडाने पाठ
2) तोंडातील पाठ
3) तोंडासाठी पाठ
4) तोंडाचा पाठ
उत्तर: 1) तोंडाने पाठ
स्पष्टीकरण: समासाचा विग्रह खालील प्रमाणे :
तोंडपाठ – तोंडाने पाठ – तृतीया तत्पुरुष
भक्तीवश – भक्तीने वश – तृतीया तत्पुरुष
राजपुत्र – राजाचा पुत्र – षष्ठी तत्पुरुष
गर्भश्रीमंत – गर्भापासून श्रीमंत – पंचमी तत्पुरुष

प्र 10: ‘सत्यार्थ प्रकाश’ (सत्याचा प्रकाश) ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे ?
1) ईश्वरचंद्र विद्यासागर
2) स्वामी विवेकानंद
3) रामकृष्ण परमहंस
4) स्वामी दयानंद सरस्वती
उत्तर: 4) स्वामी दयानंद सरस्वती
स्पष्टीकरण: सत्यार्थ प्रकाश हे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक पहिल्यांदा 1875 साली हिंदी भाषेत लिहिले होते. सन 1882 मध्ये दयानंद सरस्वतींनी त्याची दुसरी आवृत्ती काढली. हे पुस्तक संस्कृतसह 20 भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वतींनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली.

प्र 11: किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव सांगा ?
1) झोंबी
2) आठवणींचे पक्षी
3) बलुतं
4) कोल्हाट्याचं पोर
उत्तर: 4) कोल्हाट्याचं पोर
स्पष्टीकरण: आत्मचरित्र व लेखक :
किशोर शांताबाई काळे – कोल्हाट्याचे पोर
आनंद यादव – झोंबी
दया पवार – बलुतं
प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे – आठवणींचे पक्षी

प्र 12: खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे, ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले ?
1) गोपाळ हरी देशमुख
2) ज्योतिबा फुले
3) गोपाळ गणेश आगरकर
4) दयानंद सरस्वती
उत्तर: 3) गोपाळ गणेश आगरकर
स्पष्टीकरण: सुधारक हे भारतातील वृत्तपत्र आहे.
गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले.
या वृत्तपत्राची स्थापना 1888 साली करण्यात आली. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाज सुधारक, पत्रकार व शिक्षक तज्ञ होते.

प्र 13: ‘ऑलिंपिक ऑर्डर’ ने सन्मानित करण्यात आलेला अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) नेमबाजी
2) टेबल टेनिस
3) बॅडमिंटन
4) कुस्ती
उत्तर: 1) नेमबाजी
स्पष्टीकरण: ऑलिंपिक मध्ये दिलेल्या भरीव योगदानाबद्दल भारताचा माझी नेमबाज अभिनव बिंद्रा याला प्रतिष्ठेचा ‘ऑलम्पिक ऑर्डर’ ने सन्मानित करण्यात आले. अभिनव बिंद्राने 2008 साली बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा अभिनव बिंद्रा भारताचा पहिला खेळाडू ठरला होता.

प्र 14: ‘स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
1) स्वागतशील
2) स्वावलंबी
3) स्वयंसेवक
4) स्वच्छंदी
उत्तर: 3) स्वयंसेवक
स्पष्टीकरण: शब्दसमूहाबद्दल एक शब्द :
स्वयंसेवक – स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा
स्वावलंबी – स्वतःवर अवलंबून असणारा
स्वच्छंदी – आपल्या लहरीप्रमाणे वागणारा

प्र 15: प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ?
1) उत्तराखंड
2) मध्यप्रदेश
3) महाराष्ट्र
4) आसाम
उत्तर: 1) उत्तराखंड
स्पष्टीकरण: भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यांमध्ये स्थित आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 1300 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये विविध वनस्पती आणि प्राणी आहेत.

प्र 16: तामिळनाडू हे ………….. शी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे.
1) लाच
2) माहितीचा अधिकार
3) भ्रष्टाचार
4) द्वेषयुक्त भाषण
उत्तर: 2) माहितीचा अधिकार
स्पष्टीकरण: तामिळनाडू ही माहितीचा अधिकाराशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे देशातील पहिले राज्य ठरले. माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय. भारतात माहिती कायदा 11 मे 2005 रोजी केंद्र सरकारने मंजूर केला. 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा अमलात आणण्यात आला.

प्र 17: ‘माझे वडील आज गावाला गेले.’ हा वाक्य प्रकार ओळखा.
1) आज्ञार्थी
2) प्रश्नार्थी
3) विध्यर्थी
4) विधानार्थी
उत्तर: 4) विधानार्थी
स्पष्टीकरण: वाक्य प्रकार :
विधानार्थी – माझे वडील आज परगावी गेले.
प्रश्नार्थक – आम्हाला नोकरी केव्हा मिळेल ?
विध्यर्थी – मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.

प्र 18: कोणत्या महिन्याचा शेवटचा आठवडा ‘पतंग सप्ताह’ म्हणून जगभरात साजरा केला जातो ?
1) मे
2) जून
3) जुलै
4) ऑगस्ट
उत्तर: 3) जुलै

प्र 19: खालीलपैकी अव्ययीभाव समासाची जोडी शोधा.
1) क्रीडांगण, मुखकमल
2) क्रीडांगण, दरमजल
3) हरघडी, मुखकमल
4) दरमजल, हरघडी
उत्तर: 4) दरमजल, हरघडी
स्पष्टीकरण: समासाची उदाहरणे :
अव्यभव समास – दरमजल, हरघडी
तत्पुरुष समास – क्रीडांगण
कर्मधारय समास – मुखकमल

प्र 20: महात्मा ज्योतिराव फुले यांनी आजमितीच्या कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले ?
1) पश्चिम बंगाल
2) महाराष्ट्र
3) तामिळनाडू
4) कर्नाटक
उत्तर: 2) महाराष्ट्र
स्पष्टीकरण: महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते.
सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागे जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले, खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली.


Talathi Bharti 2025 Question Paper 08 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 08 | TCS Question Papers Marathi

Leave a Comment