Talathi Bharti 2025 Question Paper 07 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07

Talathi Bharti 2025 Question Paper 07 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07

नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper 07 साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

Talathi Bharti 2025 Question Paper 07
Talathi Bharti 2025 Question Paper 07 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07 | TCS Questions Papers marathi

प्रश्न 1: फळाची गोड चव ही त्यातील ……… च्या अस्तित्वामुळे असते.
1) लॅक्टोज
2) ग्लुकोज
3) गॅलेक्टोज
4) फ्रुक्टोज
उत्तर : 4) फ्रुक्टोज

प्रश्न 2: योग्य विग्रह करा.  शक्तियुक्ती
1) शक्ति आणि युक्ती
2) शक्ती किंवा युक्ती
3) शक्ती परंतु युक्ती
4) शक्ती म्हणजे युक्ती
उत्तर : 1) शक्ति आणि युक्ती
स्पष्टीकरण: विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी स्पष्टीकरण करणे होय.
विग्रह केल्यानेच त्या सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखण्यास मदत होते.
शक्तियुक्ती – शक्ती आणि युक्ती
हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे, कारण यामध्ये विग्रह करताना आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो.

प्रश्न 3: मार्च 1784 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणासोबतच्या मंगळुरूच्या तहावरवर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो – म्हैसूर युद्धाची समाप्ती केली ?
1) हैदर अली
2) टिपू सुलतान
3) वाजिद अली शाह
4) सिराज उदौला
उत्तर : 2) टिपू सुलतान
स्पष्टीकरण: मार्च 1784 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने टिपू सुलतान सोबतच्या मंगळूरच्या तहावर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो – म्हैसूर युद्धाची समाप्ती केली. टिपू सुलतान तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. टिपू सुलतानला म्हैसूरचा वाघ म्हणून देखील ओळखले जात होते.

प्रश्न 4: दख्खनच्या पठाराचा योग्य आकार खालीलपैकी कोणता आहे ?
1) चौरस
2) त्रिकोणी
3) षटकोनी
4) वर्तुळाकार
उत्तर : 2) त्रिकोणी
स्पष्टीकरण: दख्खनचे पठार दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे. दख्खनच्या पठाराचा योग्य आकार हा त्रिकोणी आहे, या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. नर्मदा नदीच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत. दख्खनच्या पठाराने देशाच्या दक्षिणेकडील बहुतांश भाग व्यापला आहे.

प्रश्न 5: मानस ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
1) महानदी
2) नर्मदा नदी
3) ब्रह्मपुत्रा नदी
4) गोदावरी नदी
उत्तर : 3) ब्रह्मपुत्रा नदी
स्पष्टीकरण: मानस नदी भुतानमध्ये द्रांगमे छू म्हणून ओळखली जाते ही दक्षिण भूतान, भारत आणि चीन मधील हिमालयाच्या पायथ्याशी एक सीमावर्ती नदी आहे. भूतान चार प्रमुख नदी प्रणालींपैकी ही एक सर्वात मोठी आहे. मानस नदी ही ब्रह्मपुत्रा नदीच्या उजव्या तीराची उपनदी आहे.

प्रश्न 6: ‘वेणीफणी’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे ?
1) वैकल्पिक द्वंद्व समास
2) तत्पुरुष समास
3) समाहार द्वंद्व समास
4) इतरेतर द्वंद्व समास
उत्तर : 3) समाहार द्वंद्व समास
स्पष्टीकरण: सामासिक शब्दाचा समास :
समाहार द्वंद्व समास – वेणीफणी, भाजीभाकरी, चहापाणी, अंथरून पांघरून
वैकल्पिक द्वंद्व समास – खरेखोटे, तीन-चार, बरेवाईट, पास-नापास
तत्पुरुष समास – अपुरा, नास्तिक, कमलनयन, मुख कमल
इतरेतर द्वंद्व समास – आईबाप, हरिहर, बहिणभाऊ, कृष्णअर्जुन

Talathi Bharti 2025 Question Paper 07

प्रश्न 7: खालीलपैकी कोणत्या शहरात पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे अनावरण करण्यात आले ?
1) नवी दिल्ली
2) मुंबई
3) बेंगळुरू
4) चेन्नई
उत्तर : 3) बेंगळुरू
स्पष्टीकरण: पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज (ISEC) बेंगळुरु येथे 8 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आले. हे घड्याळ कर्नाटक आणि देशाच्या लोकसंख्येचा रियल टाईम अंदाज प्रदान करेल. ISEC आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे.

प्रश्न 8: 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती ?
1) युक्ती मिशन
2) शक्ती मिशन
3) भक्ती मिशन
4) मुक्ती मिशन
उत्तर : 4) मुक्ती मिशन
स्पष्टीकरण: पंडिता रमाबाई यांनी 1881 मध्ये आर्य महिला सभेची स्थापना केली, जी पहिली स्त्रीवादी संघटना होती. सन 1887 मध्ये, रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली ज्याने समाजातील दिन दुबळ्यांसाठी कार्य केले. पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली.

प्रश्न 9: प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्याने, हरितद्रव्याच्या (Chlorophyll) रासायनिक संरचनेचे अवक्रमण (Degrades) होते, तेव्हा त्याला ……….. असे म्हणतात.
1) प्रकाश ऑक्सिडेशन (Photo oxidation)
2) प्रकाश श्वसन (फोटो Respiration)
3) प्रकाश फॉस्फोरिलन (Photo Phosphorylation)
4) प्रकाश अपघटन (Photolysis)
उत्तर : 1) प्रकाश ऑक्सिडेशन (Photo oxidation)
स्पष्टीकरण: प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया ज्याद्वारे हिरव्या वनस्पती आणि काही इतर जीव प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रुपांतर करतात.

प्रश्न 10: कोणता मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करतो ?
1) अनुच्छेद 17
2) अनुच्छेद 16(2)
3) अनुच्छेद 18(2)
4) अनुच्छेद 15(2)
उत्तर : 2) अनुच्छेद 16(2)
स्पष्टीकरण: अनुच्छेद 16(2) हा मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करतो. कलम 16 सर्व नागरिकांना राज्यसेवेत समान रोजगार संधी प्रदान करते. वंश, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, निवासस्थानाच्या आधारावर सार्वजनिक नोकरी किंवा नियुक्तीच्या बाबतीत कोणत्याही नागरिकांशी भेदभाव केला जात नाही.

प्रश्न 11: विंडोज 10 हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे ?
1) विंडोज AP
2) विंडोज X7
3) विंडोज NET
4) विंडोज NT
उत्तर : 4) विंडोज NT
स्पष्टीकरण: विंडोज 10 हे विंडोजच्या NT फॅमिलीतील आहे, जुलै 1993 मध्ये मायक्रोसॉफ्ट मध्ये नवीन कर्नेलवर आधारित असलेली विंडोज NT ही संचालन प्रणाली प्रकाशित केली होती. NT 3.1 विंडोज NT ची पहिली आवृत्ती ठरली.

प्रश्न 12: ‘राजा प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) नवीन कर्मणी प्रयोग
2) भावे प्रयोग
3) कर्मणी प्रयोग
4) कर्तरी प्रयोग
उत्तर : 4) कर्तरी प्रयोग
स्पष्टीकरण: प्रयोग व वाक्य :
कर्तरी प्रयोग – राजा रावणाला बोलावतो.
कर्मणी प्रयोग – मुलाने आंबे खाल्ले.
नवीन कर्मणी प्रयोग – सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला.
भावे प्रयोग – सहलीस जाताना आज कात्रजजवळ उजाडले.

प्रश्न 13: केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2024 मध्ये मान्यता दिलेली PM-AASHA ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे ?
1) रस्त्यावरील विक्रेते
2) आरोग्य विभागातील महिला कामगार
3) देशातील शेतकरी
4) ग्रामीण भागातील युवक
उत्तर : 3) देशातील शेतकरी
स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 35,000 कोटी रुपयांच्या खर्चासह PM-AASHA योजना सुरू ठेवण्यास 18 सप्टेंबर 2024 रोजी मान्यता दिली आहे. घोषणा – 2018 च्या अर्थसंकल्पात
उद्देश – शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळवून देणे आणि ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता नियंत्रित करणे.

प्रश्न 14: ‘अभ्यासाचे दप्तर जड’ या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल ?
1) जास्त अभ्यास असणे
2) दप्तरात पुस्तके जास्त
3) जड व जाड पुस्तकांचा भरणा
4) कामापेक्षा दगदगच फार
उत्तर : 4) कामापेक्षा दगदगच फार
स्पष्टीकरण: म्हण व त्यांचे अर्थ :
अभ्यासाचे दप्तर जड – कामापेक्षा दगदगच फार
टिटवी देखील समुद्र आटविते – शूद्र माणूसही प्रसंग पडल्यास मोठे कृत्य करू शकतो.

प्रश्न 15: ‘इंडिया डिव्हायडेड (1946)’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
1) डॉ. भीमराव आंबेडकर
2) डॉ. राजेंद्र प्रसाद
3) जवाहरलाल नेहरू
4) सरोजिनी नायडू
उत्तर : 2) डॉ. राजेंद्र प्रसाद
स्पष्टीकरण: इंडिया डिवाइडेड (1946) या पुस्तकाचे लेखक डॉ. राजेंद्र प्रसाद आहेत. देशाच्या फाळणीला विरोध करण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद हे 1950 ते 1962 या काळात भारताचे राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहत होते. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ देखील घेतली होती.

प्रश्न 16: ‘वायस’ या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कोणता ?
1) वृक्ष
2) वासर
3) विवंचना
4) कावळा
उत्तर : 4) कावळा
स्पष्टीकरण: महत्त्वाचे समानार्थी शब्द :
वायस – कावळा, काक, एकाक्ष
वृक्ष – झाड, तरु, झुडूप, वनस्पती, पादप
विवंचना – काळजी, चिंता, फिकीर, कळकळ

प्रश्न 17: खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पहिला विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
1) अन्नपूर्णी सुब्रमण्यम
2) गोविंदराजन पद्मनाभन
3) आवेशकुमार त्यागी
4) आनंदरामकृष्णन सी
उत्तर : 2) गोविंदराजन पद्मनाभन
स्पष्टीकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 22 ऑगस्ट 2024 रोजी पहिला विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध जीवरसायनशास्त्रज्ञ आणि बेंगळुरु येथील ‘ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ चे माजी संचालक गोविंदराजन पद्मनाभन यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्मनाभन ‘विज्ञानरत्न’ या भारतातील सर्वात प्रतिष्ठित विज्ञान पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत.

प्रश्न 18: खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पूना सार्वजनिक सभा (पूना पब्लिक सोसायटी) स्थापन केली ?
1) ईश्वरचंद्र विद्यासागर
2) बाळ गंगाधर टिळक
3) महादेव गोविंद रानडे
4) दयानंद सरस्वती
उत्तर : 3) महादेव गोविंद रानडे
स्पष्टीकरण: महादेव गोविंद रानडे यांनी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पूना सार्वजनिक सभा स्थापन केली.
पूना सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये महादेव गोविंद रानडे आणि जी. व्ही. जोशी यांनी केली. शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली होती.

प्रश्न 19: खालील शब्द समूहासाठी एक शब्द सांगा.
पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे.
1) भ्रूणहत्या
2) खून
3) आत्महत्या
4) बालहत्या
उत्तर : 1) भ्रूणहत्या
स्पष्टीकरण: महत्त्वाचे शब्दसमूह व त्यांचे अर्थ :
भ्रूणहत्या – पोटातील गर्भ जन्मआधी मारून टाकणे.
आत्महत्या – स्वतः स्वतःचा जीव घेणे.
बालहत्या – बालकाची केलेली हत्या
खून – काहीतरी कटकारस्थानाने एखाद्याचा जीव घेणे.

प्रश्न 20: भूस्खलनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशीमठ हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) अरुणाचल प्रदेश
2) उत्तराखंड
3) सिक्कीम
4) हिमाचल प्रदेश
उत्तर : 2) उत्तराखंड
स्पष्टीकरण: भूस्खलनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यांमध्ये दिसून येणारे जोशीमठ हे भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये आहे.
जोशी मठ उत्तराखंडाच्या उत्तर भागात हिमालय पर्वत रांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या 295 किमी ईशान्येत स्थित आहे.

 


Talathi Bharti 2025 Question Paper 07 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 07 | TCS Questions Papers 

Leave a Comment