Talathi Bharti 2025 Question Paper 06 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 06

Talathi Bharti 2025 Question Paper 06 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 06

नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper 06 साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

Talathi Bharti 2025 Question Paper 06
Talathi Bharti 2025 Question Paper 06 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 06

प्रश्न 1: अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते ?
1) कृष्णा नदी
2) गोदावरी नदी
3) नर्मदा नदी
4) गंगा नदी
उत्तर : 4) गंगा नदी
स्पष्टीकरण: अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील गंगा नदी निर्माण होते. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. भागीरथी आणि अलकनंदा या गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत. भागीरथी नदी 175 किमी चा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात.

प्रश्न 2: खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरीत्या आढळणारा खाद्य रंग आहे ?
1) फास्ट ग्रीन FCF
2) लायकोपिन
3) अझोरूबिन
4) इंडिगो कार्माइन
उत्तर : 2) लायकोपिन
स्पष्टीकरण: लायकोपिन हे कॅरोटीनोइड्स नावाच्या अनेक रंगद्रव्यांपैकी एक आहे.
लायकोपिन हे फळ व भाज्यांना लाल रंग देते.

प्रश्न 3: ‘वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
1) नकारार्थी वाक्य
2) संयुक्त वाक्य
3) विशेषण वाक्य
4) केवल वाक्य
उत्तर : 4) केवल वाक्य
स्पष्टीकरण: वाक्याचे प्रकार :
केवल वाक्य – वेदांत ला जांभळाची खूप झाडे दिसली.
नकारार्थी वाक्य – पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे.
संयुक्त वाक्य – विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
विशेषण वाक्य – माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा दिला.

प्रश्न 4: MS वर्ड मधील सर्व डॉक्युमेंटमध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो ?
1) .word
2) .docs
3) .docx
4) .txts
उत्तर : 3) .docx
स्पष्टीकरण: MS वर्ड मधील सर्व डॉक्युमेंटमध्ये डिफॉल्ट फाईल एक्सटेंशन.docx असते. Doc हे Document चे संक्षिप्त रूप आहे.

प्रश्न 5: ‘नाशिवंत’ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.
1) अविनाशी
2) जातिवंत
3) दीर्घायुषी
4) क्षणिक
उत्तर : 1) अविनाशी
स्पष्टीकरण: काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द :
नाशिवंत x अविनाशी
दीर्घायुषी x अल्पायुषी
जातिवंत x बदफैलू
क्षणिक x दीर्घकाळ

प्रश्न 6: खालीलपैकी कोणत्या संघटनेने 16 ऑगस्ट 1946 रोजी ‘प्रत्यक्ष कृती दिन’ साजरा केला होता ?
1) ऑल इंडिया मुस्लिम लीग
2) स्वराज्य पक्ष
3) हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
4) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर : 1) ऑल इंडिया मुस्लिम लीग
स्पष्टीकरण: प्रत्यक्ष कृती दिन – भारतीय दंगलीचा दिवस म्हणून ओळखला जातो. 16 ऑगस्ट 1946 रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीगने साजरा केला होता. मुस्लिम लीगची स्थापना डिसेंबर 1906 मध्ये लॉर्ड मिंटोच्या सिमला शिष्ट मंडळानुसार करण्यात आली होती.

प्रश्न 7: नारळ पाण्यात कोणत्या धातूचे आयन हे कमाल प्रमाणात असतात ?
1) लोह
2) सोडियम
3) मॅग्नेशियम
4) पोटॅशियम
उत्तर : 4) पोटॅशियम
स्पष्टीकरण: अमिनो आम्लापासून पोलिपेप्टाटाईड हे विकार तयार करण्यासाठी या पोषणद्रव्याची आवश्यकता असते. हे पोषण द्रव्य प्रकाश संश्लेषण तसेच श्वसनासाठी देखील आवश्यक आहे. पोटॅशियम कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषणात अडथळा होतो तसेच पानाच्या टोकावर व काठावर क्लोरोसिस दिसून येते.

Talathi Bharti 2025 Question Paper 05

प्रश्न 8: खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय शोधा. ‘मीनलला थंडी वाजते.’
1) अकर्मक कर्तरी प्रयोग
2) सकर्मक कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग
4) भावे प्रयोग
उत्तर : 1) अकर्मक कर्तरी प्रयोग
स्पष्टीकरण: प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत :
कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग
कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1) अकर्मक कर्तरी प्रयोग 2) सकर्मक कर्तरी प्रयोग

प्रश्न 9: मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात कोडावा हॉकी महोत्सव आयोजित करण्यात आला होता ?
1) कर्नाटक
2) तामिळनाडू
3) तेलंगणा
4) केरळ
उत्तर : 1) कर्नाटक
स्पष्टीकरण: मार्च 2023 कोडावा हॉकी महोत्सव कर्नाटक राज्यात आयोजित करण्यात आला होता. कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्हा हॉकीचे उगमस्थान मानले जाते. बीपी गोविंदा, एम पी गणेश, एम एम सोमय्या, यांनी हॉकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
गिनीज बुक आणि लिमका बुकमध्ये याची नोंद केली आहे.

प्रश्न 10: कोणत्या राज्य सरकारने मजूर व बांधकाम कामगारांना तात्पुरत्या घरांची सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे ?
1) राजस्थान
2) ओडिशा
3) गुजरात
4) मध्य प्रदेश
उत्तर : 3) गुजरात
स्पष्टीकरण: श्रमिक बसेरा योजना 2024 : आर्थिक दृष्ट्या अस्थिर व्यक्तींना, विशेषतः मजूर आणि बांधकाम कामगारांना लक्ष्य करून तात्पुरत्या घरांची सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने गुजरात राज्य सरकारने श्रमिक बसेरा योजना सुरू केली.  ही योजना विविध शहरांमध्ये 17 गृहनिर्माण संरचनेची स्थापना करेल, ज्यामध्ये दररोज फक्त 5 रुपयांमध्ये परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध होईल.

प्रश्न 11: माहितीचा अधिकार (RTI) अधिनियमातील सुधारणांनुसार, ………… हे केंद्रीय आणि राज्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि वेतन ठरवते.
1) केंद्र सरकार
2) भारताचे राष्ट्रपती
3) भारतीय संसद
4) भारताचे सर्वोच्च न्यायालय
उत्तर : 1) केंद्र सरकार
स्पष्टीकरण: माहिती अधिकार (सुधारणा) अधिनियम 2019 नुसार कलम 13, 16 व 27 मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत.
त्यानुसार कलम 16 मध्ये मुख्य माहिती आयुक्त चा कार्यकाल ठरवण्याचा अधिकार केंद्र शासनाला देण्यात आला आहे.
तसेच मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांच्या वेतन, मानधन किंवा इतर सेवा शर्ती केंद्र सरकार विहित करतील असे असतील.

प्रश्न 12: शंकर पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय आहे ?
1) नातीगोती
2) खोगीर भरती
3) द्राक्षांचे घोस
4) वळीव
उत्तर : 4) वळीव
स्पष्टीकरण: लेखक व त्यांची महत्त्वाची पुस्तके :
शंकर पाटील – वळीव, फक्कड गोष्टी, धिंड, जुगलबंदी, भेटीगाठी, खुश खरेदी
अशोक देशपांडे – नातीगोती, अमृता, झाला निळा पावन
पु.ल. देशपांडे – असामी, नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, खोगीर भरती

प्रश्न 13: ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांना फसव्या डार्क पॅटर्नपासून वाचवण्यासाठी कोणत्या ॲप/अनावरण केले ?
1) जागो ग्राहक जागो ॲप
2) जागृती ॲप
3) जागृती डॅशबोर्ड
4) वरील सर्व
उत्तर : 4) वरील सर्व
स्पष्टीकरण: केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांना फसव्या डार्क पॅटर्न पासून वाचवण्यासाठी 24 डिसेंबर 2024 (राष्ट्रीय ग्राहक दिन) रोजी जागो ग्राहक जागो ॲप, जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचे अनावरण केले. डार्क पॅटर्न हे दिशाभूल करणारे डिझाईन असतात जे वापर करताना अनपेक्षित कृती करण्यासाठी फसवतात, ग्राहकांचे उल्लंघन करतात.

प्रश्न 14: महिला शिक्षणाच्या संदर्भात पश्चिम भारतातील कोणते नाव घेतले जाते ?
1) स्वामी विवेकानंद
2) स्वामी दयानंद सरस्वती
3) स्वामी श्रद्धानंद
4) धोंडो केशव कर्वे
उत्तर : 4) धोंडो केशव कर्वे
स्पष्टीकरण: महिला शिक्षणाच्या संदर्भात पश्चिम भारतातील धोंडो केशव कर्वे हे नाव घेतले जाते. भारत सरकारने त्यांना 1958 मध्ये त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

प्रश्न 15: ‘तोंडात तीळ न भिजणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता होईल ?
1) हाव सुटणे
2) मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे
3) कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे
4) थुंकून देणे
उत्तर : 3) कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे
स्पष्टीकरण: वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :
तोंडात तीळ न भिजणे – कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे
हाव सुटणे – आधाशीपणा करणे किंवा हावरटपणा करणे
अवास्तव बोलणे – मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे
थुंकून देणे – त्याग करणे / सोडून देणे

प्रश्न 16: भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणता अनुच्छेद दंडात्मक स्थानबद्धतेअंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना संरक्षण मंजूर करतो ?
1) अनुच्छेद 23
2) अनुच्छेद 21
3) अनुच्छेद 20
4) अनुच्छेद 22
उत्तर : 4) अनुच्छेद 22
स्पष्टीकरण: कलम 22 – अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण
व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यांबद्दल खटला होऊन न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यावर शिक्षा म्हणून स्थानबद्ध करणे म्हणजे शिक्षात्मक स्थानबद्धता.
खटला न होता, न्यायालयात आरोप सिद्ध न होता ताब्यात घेणे म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता.

प्रश्न 17: भारताची पहिली पशुगणना कधी करण्यात आली होती ?
1) 2001-2002
2) 1919-1920
3) 1999-2000
4) 1947-1948
उत्तर : 2) 1919-1920
स्पष्टीकरण: भारताची पशुगणना सर्वात प्रथम 1919-1920 मध्ये करण्यात आली होती. भारतात पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते.
पशुगणना मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी मंत्रालयाद्वारे केली जाते.

प्रश्न 18: कोणत्या ठिकाणी 32 व्या ‘आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांच्या परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते ?
1) नवी दिल्ली
2) चंदिगड
3) भुवनेश्वर
4) चेन्नई
उत्तर : 1) नवी दिल्ली
स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र कॉम्प्लेक्स येथे 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांच्या परिषदेचे उद्घाटन केले.

प्रश्न 19: ‘सावळा गोंधळ’ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
1) नीटनेटकेपणा
2) अव्यवस्थितपणाचा कारभार
3) लांबणीवर पडलेले काम
4) कंटाळवाणे कथन
उत्तर : 2) अव्यवस्थितपणाचा कारभार
स्पष्टीकरण: सावळा गोंधळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ अव्यवस्थितपणाचा कारभार असा होतो.

प्रश्न 20: कोणते भारतीय राज्य हे तेथील अफाट पसरलेल्या उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी ओळखले जाते ?
1) महाराष्ट्र
2) राजस्थान
3) तामिळनाडू
4) झारखंड
उत्तर : 2) राजस्थान
स्पष्टीकरण: भारतातील उष्ण कटिबंधीय काटेरी वने असलेली राज्य : राजस्थानचे वाळवंट, पंजाब व उत्तर प्रदेशच्या पश्चिम भाग, गुजरात व द्वीपकल्पीय पठाराचा मध्यभाग


Talathi Bharti 2025 Question Paper 06 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 06

Leave a Comment