Talathi Bharti 2025 Question Paper 05 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 05
नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

प्रश्न 1: खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे ‘स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023’ आयोजित केले गेले होते ?
1) संरक्षण मंत्रालय
2) अर्थ मंत्रालय
3) कृषी मंत्रालय
4) जलशक्ति मंत्रालय
उत्तर : 4) जलशक्ति मंत्रालय
प्रश्न 2: बद्री ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे ?
1) उत्तराखंड
2) हरियाणा
3) गुजरात
4) ओडिशा
उत्तर : 1) उत्तराखंड
स्पष्टीकरण: भारतातील गाईंच्या जाती :
बद्री – उत्तराखंड
निलीरावी – पंजाब
मुऱ्हा – हरियाणा
महाराष्ट्र – जाफराबादी, डांगी, देवणी, खिलारी
गिर – गुजरात
राजस्थान – साहिवाल
मराठवाडा – लाल कंधारी
प्रश्न 3: खालीलपैकी कोणी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती ?
1) महादेव गोविंद रानडे
2) आत्माराम पांडुरंग
3) गोपाळ कृष्ण गोखले
4) विनायक दामोदर सावरकर
उत्तर : 4) विनायक दामोदर सावरकर
स्पष्टीकरण: अभिनव भारत सोसायटी या संस्थेची स्थापना 1904 साली विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती.
सावरकरांना जोसेफ मॅझिनीचे आकर्षण वाटू लागले म्हणून मॅझिनीच्या यंग इटली पक्षाच्या नावावरून राष्ट्रभक्त समूहास अभिनव भारत नाव देण्यात आले.
प्रश्न 4: खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते.
1) नदीला
2) मानले
3) गंगा
4) पवित्र
उत्तर : 4) पवित्र
स्पष्टीकरण: ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात.
उदा; धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इत्यादी म्हणून वरील वाक्यातील पवित्र हे नाव भाववाचक नाम आहे.
प्रश्न 5: भारताच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे नई रोशनी योजना राबवली जात आहे ?
1) कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
2) शिक्षण मंत्रालय
3) अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय
4) महिला आणि बाल विकास मंत्रालय
उत्तर : 3) अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय
स्पष्टीकरण: नई रोशनी ही योजना अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय राबवत आहे.
ही योजना अल्पसंख्यांक महिलांना ज्ञान, मूलभूत तंत्र आणि साधनांसह सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली सरकारी कल्याणकारी योजना आहे. स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था आणि सरकारी संस्था यांच्या माध्यमातून राबवली जाते.
प्रश्न 6: पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही. निःशब्द
1) शब्दकोश
2) भाषा
3) शांतता
4) वातावरण
उत्तर : 1) शब्दकोश
स्पष्टीकरण: निःशब्द म्हणजे एकही शब्द न सुचणे किंवा एकही शब्द नसणे.
निःशब्द हा विशेषण शब्दकोश या नामाबरोबर वापरले जात नाही.
प्रश्न 7: खालीलपैकी कोणत्या वर्षी बहादूर शाह जफरचा रंगूनच्या तुरुंगात मृत्यू झाला ?
1) 1868 साली
2) 1863 साली
3) 1860 साली
4) 1862 साली
उत्तर : 4) 1862 साली
स्पष्टीकरण: बहादूर शाह जफर याचा रंगूनच्या तुरुंगात मृत्यू 1862 साली झाला. हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता. तू मुघल सम्राट दुसरा अकबरशहा व त्याची हिंदू राजपूत बायको लालबाई यांचा पुत्र होता. बहादुर शाह जफर 28 सप्टेंबर 1837 मध्ये दिल्लीचा सम्राट झाला. वयाच्या 82 व्या वर्षी 1857 चा लढा इंग्रजांविरुद्ध दिला होता.
प्रश्न 8: खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जलकरार केला होता ?
1) 1960 साली
2) 1972 साली
3) 1948 साली
4) 1954 साली
उत्तर : 1) 1960 साली
स्पष्टीकरण: भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये सिंधू नदी करार झाला होता. त्या अंतर्गत रावी, बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले. तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले. सिंधू जल करारावर भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष आयुब खान यांनी स्वाक्षरी केली.
प्रश्न 9: खालील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा. निर्बुद्ध
1) ढ
2) निर्लज्ज
3) निर्दयी
4) बुद्धिमान
उत्तर : 4) बुद्धिमान
स्पष्टीकरण: महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द :
निर्बुद्ध x बुद्धिमान
निर्लज्ज x लाजरा
निर्दयी x सहदयी
ढ x हुशार
प्रश्न 10: ………….. मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती.
1) 1883 साली
2) 1884 साली
3) 1864 साली
4) 1868 साली
उत्तर : 3) 1864 साली
स्पष्टीकरण: श्रीधरलू नायडू यांच्या प्रेरणेने मद्रास या ठिकाणी वेद समाजाची स्थापना 1864 साली झाली होती. वेद समाजाला ब्राह्मो समाजाची प्रेरणा मिळाली. त्याने जातीय भेद नष्ट करण्याच्या आणि विधवा पुनर्विवाह व स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे काम केले. त्यांनी सनातनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा निषेध केला.
प्रश्न 11: 2024 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) पंजाब
4) तामिळनाडू
उत्तर : 1) महाराष्ट्र
स्पष्टीकरण: कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 : 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीतर्फे महाराष्ट्राला 2024तास सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. नागालँडला फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. 15 वी कृषी नेतृत्व परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. 2008 मध्ये या वार्षिक पुरस्कारांची स्थापना करण्यात आली आहे.
प्रश्न 12: प्रयोग ओळखा. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं.
1) कर्तरी प्रयोग
2) समापन कर्मणी प्रयोग
3) भावे प्रयोग
4) पुराण कर्मणी प्रयोग
उत्तर : 3) भावे प्रयोग
स्पष्टीकरण: वरील वाक्य हे भावे प्रयोगातील आहे.
जेव्हा वाक्यात कर्त्याऐवजी एखादी सर्वनाम आलेले असेल तेव्हा त्या जागी नाम ठेवून कर्त्याला प्रत्येक आले की नाही हे तपासावे लागते.
वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय असतात, तेव्हा ते भावे प्रयोगाचे वाक्य असते.
प्रश्न 13: भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत ?
1) अनुच्छेद 50
2) अनुच्छेद 45 A
3) अनुच्छेद 51 A
4) अनुच्छेद 51
उत्तर : 3) अनुच्छेद 51 A
स्पष्टीकरण: भारतीय राज्यघटनेतील कलमे :
अनुच्छेद 51 A – मूलभूत कर्तव्य, एकूण 11 आहेत
अनुच्छेद 50 – कार्यकारी विभाग व न्यायव्यवस्था विभक्त करणे
अनुच्छेद 51 – आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला चालना देणे
अनुच्छेद 45 – वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांचे संगोपन आणि शिक्षण याची व्यवस्था करणे.
प्रश्न 14: सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 नुसार कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळवण्यासाठीचा कमाल कालावधी किती असेल ?
1) 46 आठवडे
2) 28 आठवडे
3) 26 आठवडे
4) 24 आठवडे
उत्तर : 3) 26 आठवडे
स्पष्टीकरण: सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मातृत्व लाभ 26 आठवड्यांची रजा असेल. रजा मंजूर करत्या वेळी त्या महिलेला दोन किंवा दोन पेक्षा अधिक मुले असता कामा नयेत.
प्रश्न 15: महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोण होते ?
1) रत्नाकर गायकवाड
2) सुरेश जोशी
3) विलास पाटील
4) सुमित मलिक
उत्तर : 2) सुरेश जोशी
स्पष्टीकरण: पहिले मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी (2005 ते 2010)
प्रश्न 16: हरिकेन जॉन या शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने कोणत्या देशाला तडाखा दिला आहे ?
1) इंडोनेशिया
2) जपान
3) मादागास्कर
4) मेक्सिको
उत्तर : 4) मेक्सिको
स्पष्टीकरण: हरिकेन जॉन हे एक शक्तिशाली उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते ज्यामुळे सप्टेंबर 2024 मध्ये दक्षिण मेक्सिकोमध्ये अनेक दिवस प्राणघातक पूर आला होता. झोंबी वादळ असेही या चक्रीवादळाला नाव देण्यात आले होते.
प्रश्न 17: योग्य विग्रह करा. दऱ्याखोऱ्यात
1) दरी आणि खोऱ्यात
2) दऱ्याखोऱ्यांचा समूह
3) दरीत किंवा खोऱ्यात
4) दरीपासून खोऱ्यापर्यंत
उत्तर : 1) दरी आणि खोऱ्यात
स्पष्टीकरण: विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दांमध्ये स्पष्टीकरण देणे होय.
दऱ्याखोऱ्यात – दरीत आणि खोऱ्यात
प्रश्न 18: खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. जीव ओतणे
1) प्रेम करणे
2) सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे
3) कष्ट सोसणे
4) जीव देणे
उत्तर : 2) सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे
स्पष्टीकरण: वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :
जीव ओतणे – सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे
जीव टेकिस येणे – कष्ट सोसणे
जीव लावणे – लळा लावणे, माया लावणे
जीव घेणे – सतावणे, छळणे
प्रश्न 19: परिषदेच्या राजकारणाकडे परतण्याच्या हेतूने युक्तिवाद करण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या अंतर्गतच स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली ?
I) सी आर दत्त
II) मोतीलाल नेहरू
1) केवळ II
2) I आणि II दोन्हीही
3) I किंवा II पैकी एकही नाही
4) केवळ I
उत्तर : 2) I आणि II दोन्हीही
स्पष्टीकरण: स्वराज्य पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1923 रोजी करण्यात आली.
त्याच्या अध्यक्ष चित्तरंजनदास व सचिव मोतीलाल नेहरू होते.
सदस्य – चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, विठ्ठलभाई पटेल, जयकर मुंजे
प्रश्न 20: खालील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत ? जेव्हा माणूस जागा होतो
1) इरावती कर्वे
2) गोदावरी परुळेकर
3) विभावरी शिरूरकर
4) दुर्गा भागवत
उत्तर : 2) गोदावरी परुळेकर
स्पष्टीकरण: लेखिका व त्यांचे साहित्य :
गोदावरी परुळेकर -जेव्हा माणूस जागा होतो
दुर्गा भागवत – ऋतुचक्र, रानसरा, पैस, रूपरंग
इरावती कर्वे – युगांत, गंगाजल, भोवरा
विभावरी शिरूरकर – हिंदोळ्यावर, बळी, दोघांचे विश्व
Talathi Bharti 2025 Question Paper 05 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 05
thank you sir