Talathi Bharti 2025 Question Paper 03 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 03
नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

प्रश्न 1: बालकांच्या मोफत आणि अनिवार्य (RTE) शिक्षणाचा अधिनियम, 2009 …………. रोजी अमलात आणला गेला.
1) 1 एप्रिल 2009
2) 1 एप्रिल 2010
3) 15 ऑगस्ट 2009
4) 2 ऑक्टोबर 2009
उत्तर : 2) 1 एप्रिल 2010
स्पष्टीकरण: बालकांच्या मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिनियम 2009 हा 1 एप्रिल 2010 मध्ये अमलात आणला गेला. RTE संसदेत मान्यता 4 ऑगस्ट 2009 रोजी मिळाली होती. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. या कायद्यानुसार एखाद्या मुलाला 5 वी किंवा 8 वी किंवा दोन्ही वर्गात नापास करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांना 25 टक्के जागा राखीव असतात.
प्रश्न 2: ‘तीन रस्ते एकत्र येतात ती जागा’ शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
1) त्रिफुल
2) त्रैमार्ग
3) तिठा
4) त्रिपांध
उत्तर : 3) तिठा
स्पष्टीकरण: शब्दसमूहाबद्दल एक शब्द :
तिठा – तीन रस्ते एकत्र येतात ती जागा
चतुःपाद – चार पायावर चालणारा
चौक – चार रस्ते मिळतात ती जागा
त्रैमासिक – तीन महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे
द्विज – दोनदा जन्मलेला
त्रिसाप्ताहिक – आठवड्यातून तीन वेळा प्रसिद्ध होणारे
प्रश्न 3: खालीलपैकी कोणता प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो ?
1) गांडूळ
2) उंदीर
3) पोपट
4) सुतार मुंगी
उत्तर : 1) गांडूळ
स्पष्टीकरण: गांडूळ याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. माती भुसभुशीत करून जमिनी सुपीक करण्याचं काम हा गांडूळ करत असतो. गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा लांब शरीर असणारा सरपटणारा प्राणी आहे.
प्रश्न 5: इस्रोने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लूइड अँड थर्मल सायन्सेस’ स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे ?
1) IIT मुंबई
2) IIT दिल्ली
3) IIT कानपूर
4) IIT मद्रास
उत्तर : 4) IIT मद्रास
स्पष्टीकरण: IIT मद्रास आणि इस्रो यांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी 1.84 कोटी रुपयांच्या निधीसह ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लूइड अँड थर्मल सायन्सेस’ स्थापन करण्यासाठी करार केला आहे. अंतराळयान आणि प्रक्षेपण वाहनांमध्ये येणाऱ्या गंभीर थर्मल व्यवस्थापन आव्हानांना तोंड देणे हे या नवीन केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
प्रश्न 6: ‘बालमित्र’ या सामाजिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता आहे ?
1) बाल आहे मित्र असा जो
2) बालपणापासून असलेला मित्र
3) लहान असलेला मित्र
4) बाल आणि मित्र
उत्तर : 2) बालपणापासून असलेला मित्र
स्पष्टीकरण: योग्य समास विग्रह :
बालमित्र : लहानपणापासून असलेला मित्र
टाकसाळ : नाणी पाडण्याची जागा
झंजावत : सोसाट्याचा वारा
दरवेशी : अस्वलाचा खेळ करणारा
धनको : पैसे कर्जाने देणारा
प्रश्न 7: …………. मध्ये लढलेल्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला.
1) चौसा
2) बक्सर
3) तालिकोटा
4) प्लासी
उत्तर : 4) प्लासी
स्पष्टीकरण: प्लासीची लढाई :
सुरुवात – 23 जून 1757
इंग्रज व नवाबाचे सैन्य समोरासमोर आले होते आणि त्या इंग्रजांचा सेनापती रॉबर्ट क्लाईव्ह हा होता. नवाबाचा सेनापती मिर जाफर होता. प्लासीनंतर इंग्रजाच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. मीर जाफरने इंग्रजांना 24 परागणा जिल्ह्याचा प्रदेश दिला. बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात इंग्रजांना मुक्त व्यापार करण्याचा अधिकार मिळाला.
प्रश्न 8: खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते आहे ?
1) पोलिसाकडून चोर पकडला गेला.
2) सभेत पत्रके वाटली गेली.
3) सैनिकांनी आता मैदानावर जावे.
4) मुलीने कविता वाचली.
उत्तर : 3) सैनिकांनी आता मैदानावर जावे.
स्पष्टीकरण: भावे प्रयोग : जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी स्वतंत्र असते, त्याला भावे प्रयोग म्हणतात.
उदा;
आईने मुलीस समजावले.
सैनिकांनी आता मैदानावर जावे.
प्रश्न 9: जोग धबधब्यासाठी कोणती नदी ओळखली जाते ?
1) तुंगभद्रा नदी
2) कृष्णा नदी
3) महानदी
4) शरावती नदी
उत्तर : 4) शरावती नदी
स्पष्टीकरण: जोग धबधबा हा कर्नाटक राज्यात असून शिमोगा जिल्ह्यातील शरावती नदी वरती स्थित आहे. याची उंची 253 मीटर इतकी आहे.
प्रश्न 10: महाराष्ट्रातील खालील समाजसुधारकांपैकी कोण हे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते ?
1) विठ्ठल शास्त्री
2) गोपाळ अग्रवाल
3) बाबा आमटे
4) प्रकाश आमटे
उत्तर : 3) बाबा आमटे
स्पष्टीकरण: बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी झाला.
त्यांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे असे होते. आनंदवन 1952 साली वरोरा येथे स्थापन करून कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी मदत केली. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आदिवासींच्या विकासासाठी सुरू केला. ज्वाला आणि फुले हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.
प्रश्न 11: त्याने काम चांगल्या रीतीने केले असते, तर नोकरी कशाला गेली असती ? या वाक्याचा प्रकार ओळखा.
1) विद्यर्थी वाक्य
2) प्रश्नार्थक वाक्य
3) संकेतार्थी वाक्य
4) संयुक्त वाक्य
उत्तर : 3) संकेतार्थी वाक्य
स्पष्टीकरण: वाक्याचे प्रकार :
संकेतार्थी वाक्य – जर-तर, जरी-तरी यांसारखे त्याने काम चांगल्या रीतीने केले असते, तर नोकरी कशाला गेली असती ?
विधानार्थी वाक्य : जगात सर्व सुखी असा कोणी नाही.
प्रश्नार्थक वाक्य : जगात सर्व सुखी असा कोण आहे ?
प्रश्न 12: हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन (HRA) याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ?
1) 1923 साली
2) 1922 साली
3) 1934 साली
4) 1921 साली
उत्तर : 1) 1923 साली
स्पष्टीकरण: हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन याची स्थापना 1923 या वर्षी करण्यात आली होती.
भगतसिंग यांच्या सूचनेनुसार हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे नामांतरण हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन करण्यात आले. 8 ते 9 सप्टेंबर 1928 दिल्लीच्या फिरोजशहा कोटला या मैदानावर बैठक.
उद्दिष्ट : वैयक्तिक क्रांतिकारी कृत्य ऐवजी सशस्त्र क्रांती द्वारे भारताला ब्रिटिश शोषणापासून मुक्त करणे.
क्रांतिकारक : शिव वर्मा, चंद्रशेखर आजाद, भगतसिंग, सुखदेव धापट इ.
प्रश्न 13: लडाख कोणत्या प्रकारच्या परिस्थितीक व्यवस्थेसाठी ओळखला जातो ?
1) भरती ओहोटीचा
2) उष्ण कटिबंधीय
3) वर्षावने
4) शीत वाळवंट
उत्तर : 4) शीत वाळवंट
स्पष्टीकरण: जम्मू आणि काश्मीर या राज्याचे विभाजन 31 ऑक्टोबर 2019 मध्ये होऊन जम्मू आणि काश्मीर, लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले आहेत. लडाख सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आहे.
प्रश्न 14: मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात मिग 21 जेटचा अपघात झाला होता ?
1) हरियाणा
2) राजस्थान
3) मध्य प्रदेश
4) पंजाब
उत्तर : 2) राजस्थान
स्पष्टीकरण: मिग 21 हे एक सुपरसोनिक, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. विमानाच्या आकारामुळे पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते.
जगातील 50 देशातील चार खंडात हे विमान वापरले जाते.
प्रश्न 15: ‘घेता दिवाळी, देता शिमगा’ या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
1) कमाई थोडी कष्ट भरपूर
2) घ्यायला आनंद वाटतो, द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब
3) घरात खायची मारामार
4) उतावळेपणा करणे
उत्तर : 2) घ्यायला आनंद वाटतो, द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब
स्पष्टीकरण: घेता दिवाळी, देता शिमगा – घ्यायला आनंद वाटतो आणि द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – उतावळेपणाने मूर्खपणासारखे वर्तन करणे
डोंगर पोखरून उंदीर काढणे – कमाई थोडी कष्ट भरपूर खूप प्रयत्न केल्यानंतरही थोडेसे यश मिळते, थोड्याशा लाभासाठी फार मोठी यातायात करणे.
प्रश्न 16: मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
1) डॉ. लक्ष्मण नसीराबादकर
2) डॉ. अविनाश अवलगावकर
3) डॉ. श्रीपाल सबनीस
4) अण्णासाहेब साळुंखे
उत्तर : 2) डॉ. अविनाश अवलगावकर
स्पष्टीकरण: मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी मराठी भाषेचे गाढे अभ्यासक डॉ. अविनाश आवलगावकर यांची 3 सप्टेंबर 2024 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. रिद्धपूर (अमरावती) येथेही विद्यापीठ उभारण्यात येत आहे.
प्रश्न 17: मे 2023 मध्ये CBI ने कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या उच्चधिकार्यांविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला आहे ?
1) रोल्स रॉयस
2) ॲमेझॉन
3) गुगल
4) कोका कोला
उत्तर : 1) रोल्स रॉयस
स्पष्टीकरण: Central Bureau of Investigation
स्थापना एक एप्रिल 1963 रोजी संथानाम समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे.
केंद्रीय अन्वेषण विभाग ही भारताची विशेष पोलीस आस्थापना गुन्हे अन्वेषण विभाग व गुप्तहेर खाते आहेत. मे 2023 मध्ये CBI ने रोल्स रॉयस या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या उच्च अधिकार या विरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला होता.
प्रश्न 18: भारतात खालीलपैकी कोणते मंत्रालय नागरिकत्वाशी संबंधित आहे ?
1) संरक्षण मंत्रालय
2) गृहमंत्रालय
3) अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय
4) विधी व न्याय मंत्रालय
उत्तर : 2) गृहमंत्रालय
स्पष्टीकरण: गृहमंत्रालय हे नागरिकत्वाशी संबंधित येते, भारतीय नागरिकत्व भाग II, कलम 5 ते 11. भारतीय नागरिकांना नागरी आणि राजकीय हक्क मिळतात. परकीय नागरिकांना सर्व नागरी व राजकीय हक्क मिळत नाहीत. भारतीय नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत अधिकार संसदेला देण्यात आलेले आहेत. भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 ला लागू करण्यात आला. जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती, प्रदेश विलीन या पाच मार्गाद्वारे भारतीय नागरिकत्व स्वीकारता येते.
प्रश्न 19: 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ?
1) सिक्कीम
2) मिझोराम
3) अरुणाचल प्रदेश
4) नागालँड
उत्तर : 3) अरुणाचल प्रदेश
स्पष्टीकरण: 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता :
सर्वात जास्त लोकसंख्येची घनता :
बिहार
पश्चिम बंगाल
केरळ
सर्वात कमी लोकसंख्येची घनता :
अरुणाचल प्रदेश
अंदमान आणि निकोबार बेट
मिझोराम
प्रश्न 20: नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2005 नुसार, कोणत्या दोन देशांची नागरिक हे भारताचे परदेशी नागरिक म्हणून नोंदणी करण्यातून वगळले गेले होते ?
1) पाकिस्तान आणि बांगलादेश
2) नेपाळ आणि भूतान
3) मालदीव आणि श्रीलंका
4) चीन आणि कोरिया
उत्तर : 1) पाकिस्तान आणि बांगलादेश
स्पष्टीकरण: नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2005 नुसार पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचे नागरिक हे भारताचे परदेशी नागरिक म्हणून नोंदणी करण्यातून वगळण्यात आले होते.
Talathi Bharti 2025 Question Paper 03 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 03
1 thought on “Talathi Bharti 2025 Question Paper 03 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 03”