Talathi Bharti 2025 Question Paper 01 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 01
नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

प्रश्न 1 : भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे ?
1) अमरावती
2) चंद्रपूर
3) ठाणे
4) अहमदनगर
उत्तर : 3) ठाणे
स्पष्टीकरण : 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती.
प्रश्न 2 : विश्वभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे ?
1) रवींद्रनाथ टागोर
2) सत्येंद्रनाथ टागोर
3) द्वारकानाथ टागोर
4) राजा राममोहन रॉय
उत्तर : 1) रवींद्रनाथ टागोर
स्पष्टीकरण : विश्वभारती विद्यापीठाची स्थापना 23 डिसेंबर 1921 रोजी करण्यात आली.
उद्देश : भारतीय शिक्षणाची बीजे रोवण्यासाठी यासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
कुलपती : भारताचे पंतप्रधान असतात
प्रश्न 3 : परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो ?
1) तामिळनाडू
2) पंजाब
3) महाराष्ट्र
4) गुजरात
उत्तर : 1) तामिळनाडू
स्पष्टीकरण : मान्सूनची दुसरी शाखा बंगालचा उपसागरावरून पूर्वोत्तर राज्य बिहार व इ. भागांपर्यंत प्रवास करते. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हे वारे परत उलट दिशेने प्रवासात सुरुवात करतात यालाच ईशान्य मौसमी वारे म्हणतात. परत येताना हे वारे बाष्प गोळा करत येतात व तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस देऊन जातात.
प्रश्न 4 : संगणकांच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट (Refresh Rate) काय आहे ?
1) 20Hz
2) 40Hz
3) 200Hz
4) 60Hz
उत्तर : 4) 60Hz
स्पष्टीकरण : संगणकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट हा 60Hz असतो.
प्रश्न 5 : खालीलपैकी कोणी ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ लिहिले आहे ?
1) प्रबोधनकार ठाकरे
2) शंकर खेडकर
3) दादोबा पांडुरंग तर्खडकर
4) वसंत राव
उत्तर : 3) दादोबा पांडुरंग तर्खडकर
स्पष्टीकरण : 1837 साली मावळा प्रांतातील इंदोर संस्थानाच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम.
भिल्लांचे बंड मोडल्याबद्दल रावबहादूर ही पदवी देण्यात आली.
मराठी साहित्य :
मराठी भाषेचे व्याकरण,धर्मविवेचन, इंग्रजी व्याकरणाची पूर्व पिठिका.
त्यांनी मराठी व्याकरण लिहिले म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात.
प्रश्न 6 : 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे ?
1) राजस्थान
2) उत्तर प्रदेश
3) पश्चिम बंगाल
4) बिहार
उत्तर : 2) उत्तर प्रदेश
स्पष्टीकरण : भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची पाच राज्य :
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
बिहार
पश्चिम बंगाल
आंध्र प्रदेश
प्रश्न 7 : माहितीचा अधिकार कायदा, 2005 हा …………. पासून अंमलात आला.
1) 12 डिसेंबर 2005
2) 12 ऑक्टोबर 2005
3) 12 सप्टेंबर 2005
4) 12 नोव्हेंबर 2005
उत्तर : 2) 12 ऑक्टोबर 2005
स्पष्टीकरण : राष्ट्रपतींची सही – 15 जून 2005
लागू – 12 ऑक्टोबर 2005
व्याप्ती – संपूर्ण भारत (जम्मू काश्मीर सहित)
कलमे – 31 कलमे
प्रकरणे – 6
सूची – 2
प्रश्न 8 : यमुना नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते ?
1) देवप्रयाग
2) कानपूर
3) हरिद्वार
4) प्रयागराज (अलाहाबाद)
उत्तर : 4) प्रयागराज (अलाहाबाद)
स्पष्टीकरण : यमुना नदीचा उगम यमुनोत्री हिमनदी उत्तराखंड या ठिकाणी होतो.
लांबी – 1380 किमी
उपनद्या – हिंदन, टोन्स, चंबळ, सिंध, बेटवा
संगम – प्रयाग (अलाहाबाद) येथे गंगेस येऊन मिळते.
प्रश्न 9 : ‘गळ्यातले तुटले ओटीत पडले’ या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
1) परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे
2) पक्का निर्णय घेणे
3) नुकसान होता होता टळणे
4) खरे लपत नाही
उत्तर : 3) नुकसान होता होता टळणे
स्पष्टीकरण : म्हणी व त्याचा अर्थ :
गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता होता टळले
जैसा देश वैसा वेष – परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे
प्रश्न 10 : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले ?
1) प्लासीची लढाई
2) बक्सारची लढाई
3) गोल्डन रॉकची लढाई
4) स्वॅलीची लढाई
उत्तर : 2) बक्सारची लढाई
स्पष्टीकरण : बक्सरची लढाई (1764) :
लढाई – 22 ऑक्टोबर 1764
ठिकाण – बक्सार (बिहार)
जय युद्धात ब्रिटिशांनी अवध नवाब सुजा उद्दौला, मीर कासिम व मुगल बादशाह शाह आलम या तिघांचा एकत्रित पराभव केला.
या लढाईनंतर नंतर अलाहाबादचा तह करण्यात आला. या तहानंतर दुहेरी शासन पद्धती सुरू झाली तसेच भारतीय राज्यांमध्ये ब्रिटिश रेसिडेंटी नियुक्त करण्यात आला.
प्रश्न 11 : 1854 मध्ये, लंडन मधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे ……….. पाठवले.
1) मिशनरींचा एक गट
2) एक शैक्षणिक प्रेषण
3) सशस्त्र सेना
4) दुष्काळ आयोग
उत्तर : 2) एक शैक्षणिक प्रेषण
स्पष्टीकरण : 1854 मध्ये लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे एक शैक्षणिक प्रेषण पाठवले.
त्याचे नेतृत्व सर चार्ल्स वूड हे करत होते. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर शिक्षणाच्या पुनर्रचनेची एक सर्व समावेशक योजना तयार केली.
या योजनेचाच एक भाग म्हणून 1857 मध्ये कोलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
प्रश्न 12 : वाक्याचा प्रकार ओळखा. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का ?
1) उद्गारार्थी वाक्य
2) विधानार्थी वाक्य
3) नकारार्थी वाक्य
4) प्रश्नार्थी वाक्य
उत्तर : 4) प्रश्नार्थी वाक्य
स्पष्टीकरण : वाक्यातून प्राप्त होणाऱ्या आशयावरून किंवा अर्थानुसार वाक्याचे काही प्रकार पडतात :
विधानार्थी वाक्य : यात केवळ विधान केलेले असते.
उद्गारार्थी वाक्य : एखाद्या भावनेचा उल्लेख ज्या वाक्यात असतो ते उद्गारार्थी वाक्य असते.
प्रश्नार्थी वाक्य : ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य प्रश्नार्थी असते.
अशा वाक्यात प्रश्नचिन्हाचा (?) उपयोग केलेला असतो.
प्रश्नातील वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे म्हणून ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य होईल.
प्रश्न 13 : 1836 मध्ये स्थापन झालेल्या बंगभाषा प्रकाशिका सभेची खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता ?
1) द्वारकानाथ टागोर
2) आत्माराम पांडुरंग
3) प्रसन्न कुमार ठाकूर
4) कालीनाथ चौधरी
उत्तर : 2) आत्माराम पांडुरंग
स्पष्टीकरण : बंगभाषा प्रकाशिका सभा स्थापना 1836 साली.
संस्थापक : द्वारकानाथ टागोर, प्रसन्न कुमार ठाकूर, कालीनाथ चौधरी.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी राजकीय स्वरूपाची स्थापना झालेली ही संस्था आहे. आत्माराम पांडुरंग यांचा या सदस्य कोणताही संबंध नव्हता.
प्रश्न 14 : राज्यघटनेच्या अनुच्छेद ………. मध्ये असे म्हटले आहे की, जात, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादी कारणांवरून कोणत्याही नागरिकांशी भेदभाव केला जाणार नाही.
1) अनुच्छेद 22
2) अनुच्छेद 15
3) अनुच्छेद 19
4) अनुच्छेद 12
उत्तर : 2) अनुच्छेद 15
स्पष्टीकरण : अनुच्छेद 12 – विविध व्याख्या
अनुच्छेद 15 – धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास सक्त मनाई.
अनुच्छेद 19 – भाषण स्वातंत्र्य, संबंधीच्या विवक्षित हक्काचे संरक्षण
अनुच्छेद 22 – विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण
प्रश्न 15 : खालीलपैकी कोणत्या प्रजातीचा ऑलिव्ह रिडलेशी संबंध आहे ?
1) कासवांच्या प्रजाती
2) माशांच्या प्रजाती
3) हत्तीचा प्रजाती
4) पोथोस प्रजाती
उत्तर : 1) कासवांच्या प्रजाती
स्पष्टीकरण : हे कासव जगातील सर्व समुद्री कासवांपैकी सर्वात लहान व विपुल प्रमाणात आढळते.
निवासस्थान : पॅसिफिक अटलांटिक व हिंदी महासागराच्या उबदार पाण्यात आढळतात.
उडीसाचे गहीर माता सागरी अभयारण्य हे सागरी कासवांचे जगातील सर्वात मोठी मैले (प्रजनन करणाऱ्या प्राण्यांची वसाहत) म्हणून ओळखले जाते.
प्रश्न 16 : खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. धावा करणे
1) एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे
2) अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावणे
3) सामन्यात शंभर धावा करणे
4) मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे
उत्तर : 4) मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे
स्पष्टीकरण : धावा करणे – मदतीसाठी विनवण्या करून बोलावणे
शतक करणे – सामन्यात शंभर धावा करणे
कावराबावरा होणे – अस्वस्थ होऊन इकडे तिकडे पडणे
चर्चितचर्वण करणे – एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे
प्रश्न 17 : मार्च 2023 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणाची नेमणूक ही तज्ञमंडळाद्वारे करण्याची संबंधित निर्णय दिला ?
1) नीती आयोगाचे CEO
2) सीबीआय संचालक
3) मुख्य निवडणूक आयुक्त
4) UPSC चे अध्यक्ष
उत्तर : 3) मुख्य निवडणूक आयुक्त
स्पष्टीकरण : सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ची नेमणूक ही तज्ञ मंडळाद्वारे करण्यासंदर्भात निर्णय दिला.
समिती :
भारताचे पंतप्रधान
लोकसभा विरोधी पक्षनेते
भारताचे सरन्यायाधीश
प्रश्न 18 : पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिलेले आहे ? रणजीत देसाई
1) पानिपत
2) ययाती
3) संभाजी
4) स्वामी
उत्तर : 4) स्वामी
स्पष्टीकरण : लेखक व त्यांचे पुस्तक :
रणजीत देसाई – स्वामी
विश्वास पाटील – पानिपत
वि स खांडेकर – ययाती
विश्वास पाटील – संभाजी
प्रश्न 19 : खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. रोख
1) रंक
2) उधार
3) रुची
4) रोखठोक
उत्तर : 2) उधार
स्पष्टीकरण : महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द :
रोख x उदार
रंक x राव
रुची x अरुची
रगेल x निर्गवी
प्रश्न 20 : खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांनी समाज सुधारकाने तरुणांना शिक्षित करण्यासाठी ‘ऐक्य वर्धिनी सभे’ची स्थापना केली ?
1) लहुजी राघोजी साळवे
2) महादेव गोविंद रानडे
3) लक्ष्मण नरहर इंदापूरकर
4) वासुदेव बळवंत फडके
उत्तर : 4) वासुदेव बळवंत फडके
स्पष्टीकरण : ऐक्य वर्धिनी सभा :
स्थापना 1873 साली.
संस्थापक – वासुदेव बळवंत फडके
उद्देश – समाजात समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे
Talathi Bharti 2025 Question Paper 01 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 01
2 thoughts on “Talathi Bharti 2025 Question Paper 01 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 01”