Talathi Bharti 2025 Question Paper 02 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 02

Talathi Bharti 2025 Question Paper 02 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 02

नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

Talathi Bharti 2025 Question Paper 02
Talathi Bharti 2025 Question Paper 02 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 02

प्रश्न 1: भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारचा साक्षरता दर किती आहे ?
1) 55.80%
2) 61.80% 
3) 51.80%
4) 65.80%
उत्तर : 2) 61.80% 
स्पष्टीकरण : सर्वाधिक साक्षर राज्य :
केरळ : 94%
लक्षद्वीप : 91.85%
मिझोरम : 91.33%
गोवा : 88.7%
त्रिपुरा : 87.22%
सर्वात कमी साक्षर राज्य :
बिहार : 61.80%
अरुणाचल प्रदेश : 65.38%
राजस्थान : 66.11%
झारखंड : 66.41%
मणिपूर : 66.82%

प्रश्न 2: 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला होता ?
1) डॅनिश
2) फ्रेंच
3) इंग्रज
4) डच
उत्तर : 3) इंग्रज
स्पष्टीकरण : 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना इंग्रजांनी उभारला होता.

प्रश्न 3: भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
I) मुख्य माहिती आयुक्त यांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते.
II) कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही.
1) I आणि II पैकी एकही नाही
2) फक्त I
3) फक्त II
4) I आणि II दोन्ही
उत्तर : 3) फक्त II
स्पष्टीकरण : केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांचा पदावधी: कलम 13(1)
मुख्य माहिती आयुक्त केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कालावधी करिता पद धारण करतात.
ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात.
कोणताही मुख्य माहिती आयुक्त त्याच्या वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदावर राहू शकत नाही.

प्रश्न 4: …………. मध्ये, वल्लभ भाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले.
1) 1926 साली
2) 1924 साली
3) 1928 साली
4) 1922 साली
उत्तर : 3) 1928 साली
स्पष्टीकरण : बारडोली सत्याग्रह चळवळीची सुरुवात : 12 जून 1928.
ठिकाण : बारडोली, सुरत जिल्हा
नेतृत्व : सरदार वल्लभभाई पटेल
कारण : ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांवर वाढीवकर आकारणी केली होती ही वाढ 30% नी होती.

प्रश्न 5: खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतीत पावन मंदिर बांधले ?
1) डॉ. केशव बळीराम हेडगेवार
2) पंडित मदन मोहन मालवीय
3) गोपाळ हरी देशमुख
4) व्हि.डी. सावरकर
उत्तर : 4) व्हि.डी. सावरकर
स्पष्टीकरण : पतीत पावन मंदिर स्थापन – 1931 साली
ठिकाण : रत्नागिरी
पुढाकार : स्वातंत्र्यवीर सावरकर
पतीत पावन म्हणजे अशुद्धांना शुद्ध करणारा.
हे मंदिर बांधण्यामागील उद्देश हा अस्पृश्य लोकांसह सर्व लोकांना देवाची पूजा करता येणार होती.

प्रश्न 6: स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
I) त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली.
II) ती विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते.
1) फक्त I
2) फक्त II
3) I किंवा II पैकी एकही नाही
4) I आणि II दोन्ही
उत्तर : 1) फक्त I
स्पष्टीकरण : पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून सरस्वती संप्रदायाची दीक्षा घेऊन 1848 मध्ये संन्यास घेतला.
10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली.

प्रश्न 7: भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘न्याय’ यासंदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे ?
1) सार्वभौम
2) धर्मनिरपेक्ष
3) समाजवादी
4) आर्थिक
उत्तर : 4) आर्थिक
स्पष्टीकरण : प्रस्ताविकेत न्यायाची तीन स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली आहेत.
सामाजिक न्याय : म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल.
आर्थिक न्याय : उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे
राजकीय न्याय : सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता इत्यादींचा समावेश होतो.

प्रश्न 8: भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे ?
1) अनुच्छेद 6
2) अनुच्छेद 5
3) अनुच्छेद 7
4) अनुच्छेद 8
उत्तर : 2) अनुच्छेद 5
स्पष्टीकरण : भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी आहेत.
कलम 5 – संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व
कलम 6 – पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 7 – स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क
कलम 8 – मूळचा भारतीय असलेल्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क

Talathi Bharti 2025 Question Paper 02

प्रश्न 9: मेंदूमध्ये ………… हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे.
1) पाठीचा कणा
2) मध्य मस्तीष्क
3) प्रमस्तीष्क
4) अग्रमस्तीष्क
उत्तर : 4) अग्रमस्तीष्क
स्पष्टीकरण : मेंदूचे मुख्यतः तीन भाग पडतात.
अग्रमस्तीष्क, मध्य मस्तिष्क, प्रमस्तीष्क
मेंदूमध्ये विचार मंथन करणारा मुख्य भाग म्हणजेच अग्रमस्तीष्क आहे.

प्रश्न 10: भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज (Vertical Lift Sea Bridge) खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) आंध्र प्रदेश
2) तामिळनाडू
3) महाराष्ट्र
4) केरळ
उत्तर : 2) तामिळनाडू
स्पष्टीकरण : व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज :
ठिकाण – मंडपम (तामिळनाडू)
लांबी – 2.05 किमी
हा एक रेल्वे पूल असून रामेश्वरम ला तामिळनाडूशी जोडतो.
रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा पंबम रेल्वे पूल 105 वर्ष जुना आहे.

प्रश्न 11: ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला …………. या नावाने ओळखले जाते.
1) यमुना
2) त्सांग पो
3) दिहांग
4) मेघना
उत्तर : 3) दिहांग
स्पष्टीकरण : ब्रह्मपुत्रा नदी :
उगम : मानसरोवर (तिबेट)
एकूण लांबी : 2900किमी
उपनद्या : मानस, चंपावती, कोपिली, तिस्ता, सुबनविरी
काठावरील शहरे : गुवाहाटी, दिब्रुगड
भारतातील सर्वात मोठे नदीवरील बेट माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे.
अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला दिहांग या नावाने ओळखले जाते.

प्रश्न 12: खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते ?
1) बाभूळ
2) अर्जुन
3) सर्पगंधा
4) कांचन
उत्तर : 4) कांचन
स्पष्टीकरण : भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांचा वापर पचन समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
हे उत्तम प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि कर्करोग विरोधी क्रियाकल्पासाठी वापरतात.

प्रश्न 13: जेव्हा वर्षजलाचा pH ……… असतो, तेव्हा त्याला आम्ल वर्ष म्हणतात.
1) 6.6 पेक्षा जास्त
2) 6.6 पेक्षा कमी
3) 5.6 पेक्षा जास्त
4) 5.6 पेक्षा कमी
उत्तर : 4) 5.6 पेक्षा कमी
स्पष्टीकरण : आम्ल वर्ष :
हायड्रोजन आयनची उच्च पातळी म्हणजेच pH 5.6 पेक्षा कमी असलेला पाऊस किंवा पर्जन्यवृष्टीला आम्लवर्षा म्हणतात.
सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड हे आम्ल पर्जन्यास कारणीभूत असतात.
जीवाश्म इंधन जाळणे, ज्वालामुखी क्रिया इत्यादींमुळे सल्फर ऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड तयार होतात.
हे ऑक्साईड्स पाण्याची अभिक्रिया झाल्यानंतर आम्ल स्वरूपात जमिनीवर येतात.

प्रश्न 14: कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘स्वरूप बदलणे’ असा आहे ?
1) मेटामोर्फोस (Metamorphos)
2) ऍक्वास (Aquos)
3) इग्निस (Ignis)
4) सेडीमेंटेशन (Sedimentation)
उत्तर : 1) मेटामोर्फोस (Metamorphos)
स्पष्टीकरण : मेटामोर्फोस या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो.

प्रश्न 15: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये PM- VIKAS बद्दल चर्चा केली गेली, याचे पूर्ण रूप काय आहे ?
1) पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान (PM – Vishawakarma Kaushal Samman)
2) पंतप्रधान विकसित कौशल सन्मान (PM – Viksit Kaushal Samman)
3) पंतप्रधान विज्ञान कौशल सन्मान (PM – Vigyan Kaushal Samman)
4) पंतप्रधान विज्ञान कालिदास सन्मान (PM – Vigyan Kalidas Samman)
उत्तर : 1) पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान (PM – Vishawakarma Kaushal Samman)
स्पष्टीकरण : PM – VIKAS – पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना
मंत्रालय – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
घोषणा – 2023-24 चा अर्थसंकल्पात
उद्देश – पारंपारिक कला व हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्य पॅकेजची तरतूद करणे.

प्रश्न 16: महात्मा ज्योतिराव फुले यांनी ………….. मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
1) 1879 साली
2) 1885 साली
3) 1864 साली
4) 1873 साली
उत्तर : 4) 1873 साली
स्पष्टीकरण : स्थापना : 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी करण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्यशोधक समाजाची तत्वे : समता, बंधुता, धार्मिक कार्यातील मध्यस्थांचे उच्चांक

प्रश्न 17: खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही ?
1) विंडोज
2) पावर पॉइंट
3) लिनक्स
4) मॅकिंतोश
उत्तर : 2) पावर पॉइंट
स्पष्टीकरण : संगणक user Friendly हाताळण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमची महत्त्वाची भूमिका असते.
सध्या मार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम खालील प्रमाणे आहेत.
विंडोज
मॅकिंतोश
लिनक्स

प्रश्न 18: खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये (टक्केवारीत) सर्वाधिक वाढ अनुभवली ?
1) 1961 – 1971
2) 1951 – 1961
3) 1981 – 1991
4) 2001 – 2011
उत्तर : 1) 1961 – 1971

प्रश्न 19: माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत, 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतात …………. स्थापना करण्यात आली आहे.
1) मुख्य माहिती आयोग
2) केंद्रीय माहिती आयोग
3) मुख्य माहिती समिती
4) केंद्रीय माहिती समिती
उत्तर : 2) केंद्रीय माहिती आयोग
स्पष्टीकरण : माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पद्धत दाखवून देतो. हे आयोग नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अपिलीय प्राधिकरण म्हणून कार्य करते.

प्रश्न 20: स्वयंपोषीत जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा कशाद्वारे पूर्ण केल्या जातात ?
1) हरितद्रव्य
2) ग्लायकोजेनेसिस
3) रसायन संश्लेषण
4) प्रकाश संश्लेषण
उत्तर : 4) प्रकाश संश्लेषण
स्पष्टीकरण : हे जिवाणू स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.
हे प्रकाश आणि रासायनिक प्रक्रिये द्वारे ऊर्जा प्राप्त करतात त्यासाठी ते कार्बनचा देखील वापर करतात.
हे जिवाणू प्रकाश संश्लेषण करून आपली ऊर्जेची गरज भागवतात.

 


Talathi Bharti 2025 Question Paper 02 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 02

Leave a Comment