Talathi Bharti 2025 Question Paper 09 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 09 | TCS Question Papers Marathi

Talathi Bharti 2025 Question Paper 09 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 09

नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper 09 साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

Talathi Bharti 2025 Question Paper 09
Talathi Bharti 2025 Question Paper 09 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 09 | TCS Question Papers Marathi

प्र 1: धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ?
1) 1893 साली
2) 1898 साली
3) 1890 साली
4) 1895 साली
उत्तर: 1) 1893 साली
स्पष्टीकरण: धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना 1893 मध्ये केली. धोंडू किशोर कर्वे यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यासाठी आपलं मोलाचे योगदान दिलं आहे. 1907 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

प्र 2: ‘सत्कृत्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
1) कृत्य
2) दुर्दैव
3) दुष्कृत्य
4) कृतकृत्य
उत्तर: 3) दुष्कृत्य
स्पष्टीकरण: महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द :
सतकृत्य x दुष्कृत्य
दुर्दैव x सुदैव
कृत्य x अकृत्य
कामचुकार x कामसू

प्र 3: 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर 80% पेक्षा कमी आहे ?
1) मिझोराम
2) पश्चिम बंगाल
3) त्रिपुरा
4) गोवा
उत्तर: 2) पश्चिम बंगाल
स्पष्टीकरण: सन 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील साक्षरता दर 74.04 टक्के होता, जो 2001 मध्ये 64.84 टक्के होता.
सन 2011 च्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगाल राज्यातील महिला साक्षरता दर 80 टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतीय राज्यांमध्ये केरळमध्ये सर्वाधिक साक्षरता दर 96.2 टक्के आहे.

प्र 4: झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते ?
1) अंदमान आणि निकोबार बेटे
2) लक्षद्वीप
3) जम्मू आणि काश्मीर
4) यापैकी नाही
उत्तर: 3) जम्मू आणि काश्मीर

प्र 5: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) 14 नोव्हेंबर 2024 रोजी चाचणी केलेले ‘पिनाका’ हे काय आहे ?
1) रॉकेट
2) पाणबुडी
3) ड्रोन
4) रणगाडा
उत्तर: 1) रॉकेट
स्पष्टीकरण: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने 14 नोव्हेंबर 2024 रोजी विविध फिल्डमध्ये फायरिंग रेंजवर ‘ गायडेड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट ‘ (MBRL) प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. भगवान शिवाच्या पौराणिक धनुष्यावरून पिनाका हे नाव ठेवण्यात आले आहे.

प्र 6: ‘पाट्या टाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
1) एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे
2) नाईलाजास्तव काम करणे
3) चिंता व्यक्त करणे
4) पाठीवर लेखन करणे
उत्तर: 2) नाईलाजास्तव काम करणे
स्पष्टीकरण: वाक्प्रचार व अर्थ :
पाट्या टाकणे – नाईलाजास्तव काम करणे
ध्यास घेणे – उत्कट इच्छेने एखाद्या गोष्टीचे चिंतन करणे
चिंता व्यक्त करणे – काळजी वाटणे

Talathi Bharti 2025 Question Paper 09

प्र 7: 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि ………… हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनले.
1) चंद्रशेखर आझाद
2) चित्तरंजन दास
3) सुभाषचंद्र बोस
4) जवाहरलाल नेहरू
उत्तर: 2) चित्तरंजन दास
स्पष्टीकरण: असहकार आंदोलन ठरावातील विधिमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. चित्तरंजन दास हे त्या पक्षाचे अध्यक्ष व मोतीलाल नेहरू हे सचिव बनले.

प्र 8: म्हादेई वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) गोवा
2) मणिपूर
3) आसाम
4) छत्तीसगड
उत्तर: 1) गोवा
स्पष्टीकरण: म्हादेई वन्यजीव अभयारण्य गोवा या राज्यात स्थित आहे. म्हादेई अभयारण्य हे गोव्याच्या उत्तरेकडील भागात वाल्पोई शहराजवळ, सांगेम तालुक्यात आहे. हे अभयारण्य गोव्यातील व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण अधिवासाचे प्रतिनिधित्व करते. प्राण्यांच्या जैवविविधतेमध्ये बिबट्या, रॉयल बंगाल टायगर, जंगली मांजर, आशियाई हत्ती, रानडुक्कर इत्यादींचा समावेश होतो.

प्र 9: 2011 च्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या …………. टक्के आहे.
1) 1.7 टक्के
2) 1.4 टक्के
3) 0.4 टक्के
4) 0.7 टक्के
उत्तर: 4) 0.7 टक्के
स्पष्टीकरण: सन 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटीहून अधिक आहे. यामध्ये 96.63 कोटी हिंदू आणि 17.72 कोटी मुस्लिम आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 79.8 टक्के हिंदू आणि 14.2 टक्के मुस्लिम आहेत. त्यांच्या खालोखाल ख्रिश्चन 2.78 कोटी (2.3 टक्के) शीख 2.8 कोटी (1.7 टक्के) आणि बौद्ध 0.7 टक्के आहेत.

प्र 10: युनेस्कोने कोणत्या राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च ठिकाण म्हणून घोषित केले आहे ?
1) उत्तर प्रदेश
2) गुजरात
3) राजस्थान
4) पश्चिम बंगाल
उत्तर: 4) पश्चिम बंगाल
स्पष्टीकरण: युनेस्कोने पश्चिम बंगाल या राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च ठिकाण म्हणून घोषित केले आहे.

प्र 11: ‘उंचावरून पडणारा पाणलोट’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
1) बोगदा
2) सरिता
3) महापूर
4) धबधबा
उत्तर: 4) धबधबा
स्पष्टीकरण: शब्दसमूहाबद्दल एक शब्द :
धबधबा – उंचावरून पडणारा पाणलोट
बोगदा – डोंगर पोकरून आरपार केलेला रस्ता
रोजखर्डा – रोजच्या हिशोबाची टिपणवही
लेणे – डोंगरात पाषाणावर कोरलेले प्रकार

Talathi Bharti 2025 Question Paper 07

प्र 12: वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?
1) बॉम्बे
2) लखनऊ
3) मद्रास
4) कलकत्ता
उत्तर: 4) महात्मा ज्योतिराव फुले
स्पष्टीकरण: श्रीधरलू नायडू यांच्या प्रयत्नांनी सन 1864 मध्ये मद्रास येथे वेद समाजाची स्थापना झाली. वेद समाजाला ब्राह्मो समाजाची प्रेरणा मिळाली. त्याने जातीय भेद नष्ट करण्याचे आणि विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे काम केले.

प्र 13: जातीभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र (श्रमिक वर्ग) आणि अतिशूद्र (अस्पृश्य) यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणी मांडला ?
1) विनोबा भावे
2) डॉ. भीमराव आंबेडकर
3) बाळ गंगाधर टिळक
4) महात्मा ज्योतिराव फुले
उत्तर: 4) महात्मा ज्योतिराव फुले
स्पष्टीकरण: जातिभेदाला आव्हान देण्यासाठी शूद्र आणि अतिशूद्र त्यांनी एकत्र यावे असा प्रस्ताव महाराष्ट्रातील ज्योतिबा फुले यांनी मांडला होता. ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते.

प्र 14: पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला …………. म्हणतात.
1) कन्नड मैदान
2) उत्तरी सरकार
3) मलबार किनारपट्टी
4) कोरोमंडल किनारपट्टी
उत्तर: 4) कोरोमंडल किनारपट्टी
स्पष्टीकरण: पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला कोरोमंडल किनारपट्टी म्हणतात. कोरोमंडल किनारा हा भारतीय उपखंडाचा आग्नेय किनारपट्टीचा प्रदेश आहे, जो उत्तरेला उत्कल मैदानी, पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला कावेरी डेल्टा आणि पश्चिमेला पूर्व घाटांनी व्यापलेला आहे. कोरोमंडल किनारा भारताच्या तामिळनाडू राज्यातील पूर्व घाटात स्थित आहे.

प्र 15: लीड्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोणत्या देशाने सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण केला आहे ?
1) भारत
2) अमेरिका
3) चीन
4) रशिया
उत्तर: 1) भारत
स्पष्टीकरण: प्लास्टिक कचरा तयार करण्यात भारत हा अव्वल क्रमांकावरती आहे. जगभरात एका वर्षात 5.7 कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती होते. त्यापैकी सर्वाधिक 1.02 टक्के कोटी टन कचरा एकट्या भारतात तयार होतो. लेट्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात समोर आले आहे की भारत हा प्लास्टिक कचरा तयार करण्यात अव्वल क्रमांकावर आहे. त्यानंतर नायजेरिया आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे.

प्र 16: ‘तोरणा किल्ला जसा काबीज करायचा याविषयी छत्रपती शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांशी ………..’ रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा.
1) आनंद साजरा केला
2) खल केला
3) आग ओकली
4) गुजगोष्टी केल्या
उत्तर: 2) खल केला
स्पष्टीकरण: वाक्प्रचार व अर्थ :
आनंदाला उधान येणे – खूप आनंद होणे
आनंदाला पारावारा न उरणे – अति आनंद होणे
आग ओकने – रागाने फटकळ बोलणे

प्र 17: …………. 2023 रोजी, लोकसभेत जैवविविधता (सुधारणा) विधेयक, 2021 मंजूर करण्यात आले.
1) 25 एप्रिल
2) 25 जुलै
3) 25 मार्च
4) 5 जून
उत्तर: 2) 25 जुलै
स्पष्टीकरण: 25 जुलै 2024 रोजी लोकसभेत जैवविविधता विधेयक 2021 मंजूर करण्यात आले. भारतातील शाश्वत जैवविविधता संवर्धन आणि उपयोगाला समर्थन देता सध्याच्या गरजा आणि घडामोडीच्या अनुषंगाने कायद्याचे संरक्षण करण्यासाठी या सुधारणांची रचना करण्यात आली आहे.

प्र 18: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना …………. वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.
1) 18 ते 60 वर्षे
2) 18 ते 40 वर्षे
3) 18 ते 70 वर्षे
4) 18 ते 50 वर्षे
उत्तर: 3) 18 ते 70 वर्षे
स्पष्टीकरण: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला वार्षिक फक्त बारा रुपये जमा करावे लागतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकाला दोन लाख रुपये देण्याची तरतूद आहे.

प्र 19: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जाहीर केलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक’ मध्ये भारत कितव्या स्थानी आहे ?
1) 12 व्या
2) 22 व्या
3) 52 व्या
4) 72 व्या
उत्तर: 4) 72 व्या
स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 25 जून 2024 रोजी 174 देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तयारीचा पातळीचा मागवा घेणारा कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक डॅशबोर्ड जारी केला. या निर्देशांकात भारत 0.49 रेटिंगसह 72 व्या स्थानी आहे. सिंगापूर पहिल्या स्थानी असून त्यानंतर अमेरिका आणि डेन्मार्क या देशाचा समावेश होतो.

प्र 20: ‘भारुड’ हा काव्यप्रकार सर्वाधिक लोकप्रिय कोणी केला ?
1) संत रामदास
2) संत एकनाथ
3) शाहीर होनाजी
4) संत तुकाराम
उत्तर: 2) संत एकनाथ
स्पष्टीकरण: संत व त्यांच्या रचना :
संत रामदास – मनाचे श्लोक
संत एकनाथ – भारुड
शाहीर होनाजी – शाहिरी
संत तुकाराम – गाथा


Talathi Bharti 2025 Question Paper 09 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 09 | TCS Question Papers Marathi

Leave a Comment