Talathi Bharti 2025 Question Paper 04 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 04
नमस्कार मित्रांनो, TCS Pattern वर आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टद्वारे Talathi Bharti 2025 Question Paper साठी TCS Pattern नुसार महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे घेत आहोत. यामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला जसास तसे तलाठी भरती 2023 मध्ये TCS Pattern ने विचारलेले आहेत.

प्रश्न 1: भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात बर्डा वन्यजीव अभयारण्य आहे ?
1) गुजरात
2) आसाम
3) उत्तराखंड
4) महाराष्ट्र
उत्तर : 1) गुजरात
स्पष्टीकरण: बर्डा वन्यजीव अभयारण्य :
ठिकाण पोरबंदर जिल्हा गुजरात राज्यामध्ये स्थित आहे.
स्थापना हा 1979 साली
प्राणी – नीलगाय, चिंकारा, काळवीट, लांडगा
प्रश्न 2: वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मुखवटा चढवणे.
1) चेहरा लपवणे
2) गंमत म्हणून प्राण्या पक्षांचे चेहरे चिटकवणे
3) मनातली भावना लपवणे
4) मुखपट्टी घालणे
उत्तर : 3) मनातली भावना लपवणे
स्पष्टीकरण: मुखवटा चढवणे म्हणजे मनातील एखादी भावना लपवून ठेवणे.
प्रश्न 3: 2011 च्या जनगणनेनुसार, ख्रिश्चन धर्मीय समुदाय हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे ?
1) 2.3 टक्के
2) 3.7 टक्के
3) 1.8 टक्के
4) 0.9 टक्के
उत्तर : 1) 2.3 टक्के
स्पष्टीकरण: भारतातील धार्मिक लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार :
हिंदू – 79.8 टक्के
मुस्लिम 14.2 टक्के
ख्रिश्चन – 2.3 टक्के
शिख – 1.7 टक्के
बौद्ध – 0.7 टक्के
जैन – 0.4 टक्के
प्रश्न 4: समास ओळखा. पंचप्राण
1) बहुव्रीही समास
2) तत्पुरुष समास
3) द्वंद्व समास
4) द्विगु समास
उत्तर : 4) द्विगु समास
स्पष्टीकरण: पंचप्राण – पाच प्राण्यांचा समूह
द्विगु समास : ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे आहे तर पहिले पद हे संख्या विशेषण आहे आणि अशा सामासिक शब्दांवरून एका समूहाचा बोध होतो, तेव्हा त्यास द्विगु समास म्हणतात.
द्विगु समासाची काही उदाहरणे :
पंचवटी – पाच वडांचा समूह
नवरात्र – नवरात्रींचा समूह
प्रश्न 5: खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात उपदान प्रदान (पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी) अधिनियम अधिनियमित करण्यात आला ?
1) 1962 साली
2) 1972 साली
3) 1982 साली
4) 1952 साली
उत्तर : 2) 1972 साली
स्पष्टीकरण: पेमेंट ऑफ ग्रज्युएटी ॲक्ट 1972
लागू – 16 सप्टेंबर 1972 साली
हेतू – हा कायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किंवा किमान पाच वर्षाच्या सेवेनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देतो.
हा कायदा किमान 20 कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांना लागू होतो.
प्रश्न 6: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 11 नुसार, खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे ?
1) भारताचे सर्वोच्च न्यायालय
2) भारताचे राष्ट्रपती
3) भारताचे पंतप्रधान
4) भारतीय संसद
उत्तर : 4) भारतीय संसद
स्पष्टीकरण: भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 11 नुसार भारतीय संसदेला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे.
नागरिकत्वाच्या संबंधातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबी यांच्या संबंधित कोणतीही तरतूद करण्याचे संसदेचे अधिकार असतील.
प्रश्न 7: कच्च्या फळांना पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो ?
1) ॲसिटिलीन
2) हायड्रोजन
3) कार्बन डाय-ऑक्साइड
4) इथिन
उत्तर : 1) ॲसिटिलीन
स्पष्टीकरण: काही देशांमध्ये ॲसिटिलीन वायु कृत्रिमरित्या फळ पिकवण्यासाठी वापरला जातो.
जेव्हा कॅल्शियम कार्बाइड आद्रतेच्या संपर्कात येतो, तो ॲसिटिलीन वायु तयार करतो, हवा येऊ नैसर्गिकरित्या फळ पिकवणारा कारक, इथिलीन सारखाच असतो.
प्रश्न 8: खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निर्धार
1) निबिड
2) नित्य
3) निवाडा
4) निश्चय
उत्तर : 4) निश्चय
स्पष्टीकरण: महत्त्वाचे समानार्थी शब्द :
निर्धार = निश्चय, निग्रह, दृढसंकल्प
निबिड = घनदाट, गडद
नित्य = सतत, नेहमी, सदैव
निवाडा = निर्णय, न्याय
प्रश्न 9: कोणत्या वर्षी, टीम बर्नर्स ली ने वर्ल्ड वाईड वेब (www) चा शोध लावला ?
1) 1990 साली
2) 1981 साली
3) 1987 साली
4) 1999 साली
उत्तर : 1) 1990 साली
स्पष्टीकरण: 1990 मध्ये टीम बर्नर्स ली ने वर्ल्ड वाईड वेब (www) चा शोध लावला.
प्रश्न 10: खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो ?
1) पासीघाट
2) मौसिनराम
3) महाबळेश्वर
4) अगुंबे
उत्तर : 2) मौसिनराम
स्पष्टीकरण: ठिकाण : पूर्व खासी टेकड्या, निघाले
सर्वाधिक पावसाची नोंद – 11872 mm पाऊस.
प्रश्न 11: ………….. मध्ये, भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय ही पदवी दिली गेली.
1) 1858 साली
2) 1868 साली
3) 1862 साली
4) 1852 साली
उत्तर : 1) 1858 साली
स्पष्टीकरण: 1858 साली भारताच्या गव्हर्नर जनरल ला व्हाईसरॉय ही पदवी दिली गेली.
प्रश्न 12: ‘आदिम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
1) असंस्कृत
2) प्राचीन
3) प्रथम
4) प्रगत
उत्तर : 4) प्रगत
स्पष्टीकरण: विरुद्धार्थी शब्द :
आदिम x प्रगत
प्राचीन x आधुनिक
असंस्कृत x संस्कृत
प्रथम x अंतिम
प्रश्न 13: खालीलपैकी कोणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती ?
1) गोपाळ कृष्ण गोखले
2) आत्माराम पांडुरंग
3) महादेव गोविंद रानडे
4) गणेश सावरकर
उत्तर : 2) आत्माराम पांडुरंग
स्पष्टीकरण: प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 साली मुंबई या ठिकाणी करण्यात आली.
संस्थापक – आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग व भाऊ महाजन.
मुखपत्र – सुबोध पत्रिका नियतकालिक
प्रश्न 14: खालील शब्दाचा समास ओळखा. त्रिमूर्ती
1) बहुव्रीही समास
2) तत्पुरुष समास
3) अव्ययीभाव समास
4) द्विगु समास
उत्तर : 4) द्विगु समास
स्पष्टीकरण: द्विगु समास : ज्या सामासिक शब्दांची दुसरी पदे महत्वाची असतात तसेच पहिले पदे महत्वाची असतात तसेच पहिले पद हे संख्या विशेषण असतात त्यांना द्विगु समास असे म्हणतात.
प्रश्न 15: भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे ?
1) अनुच्छेद 343
2) अनुच्छेद 218
3) अनुच्छेद 132
4) अनुच्छेद 368
उत्तर : 1) अनुच्छेद 343
स्पष्टीकरण: अनुच्छेद 132 : विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयांवरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकारीता.
अनुच्छेद 218 – सर्वोच्च न्यायालयासंबंधीत तरतूद उच्च न्यायालयांना लागू असणे
अनुच्छेद 343 – संघराज्याची भाषा
अनुच्छेद 368 – घटना दुरुस्ती
प्रश्न 16: रामकृष्ण मिशनचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत ?
1) ईश्वरचंद्र विद्यासागर
2) राजा राममोहन रॉय
3) स्वामी विवेकानंद
4) स्वामी दयानंद सरस्वती
उत्तर : 3) स्वामी विवेकानंद
स्पष्टीकरण: रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 साली कोलकत्ता या ठिकाणी करण्यात आली होती.
संस्थापक – स्वामी विवेकानंद
मुख्यालय – बेलूर मठ (पश्चिम बंगाल)
उद्देश – वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार करणे
प्रश्न 17: वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘गरुडाकडून साप पकडला गेला.’
1) कर्मणी प्रयोग
2) पुराण कर्मणी
3) समापन कर्मणी प्रयोग
4) नवीन कर्मणी
उत्तर : 4) नवीन कर्मणी
स्पष्टीकरण: ज्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल दर्शवितो ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते.
नवीन कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना केलेली असते.
उदा; गरुडाकडून साप पकडला गेला.
सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला.
प्रश्न 18: खालीलपैकी कोणत्या लेखकाने ‘रणांगण’ हे पुस्तक लिहिले आहे ?
1) विश्राम बेडेकर
2) राजन गवस
3) रंगनाथ पठारे
4) व्यंकटेश माडगूळकर
उत्तर : 1) विश्राम बेडेकर
स्पष्टीकरण: लेखक व त्यांचे साहित्य :
विश्राम बेडेकर – रणांगण
राजन गवस – तणकट
व्यंकटेश माडगूळकर – सत्तांतर
रंगनाथ पठारे – ताम्रपट
प्रश्न 19: 2023 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे ?
1) दिल्ली
2) अहमदाबाद
3) मुंबई
4) कोलकाता
उत्तर : 3) मुंबई
स्पष्टीकरण: सन 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील मुंबई शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
सध्या भारतात जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात.
देशातील एकूण सहा अल्पसंख्याकांपैकी केवळ पारशींचीच लोकसंख्या घटली आहे.
पारशी लोकसंख्येतील घसरण रोखण्यासाठी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय जियो पारशी नावाची समुदाय संबंधित योजना राबवते.
प्रश्न 20: 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे 1000 च्या वर आहे ?
I) गोवा
II) केरळ
1) केवळ I
2) केवळ II
3) I आणि II
4) I किंवा II पैकी एकही नाही
उत्तर : 3) I आणि II
स्पष्टीकरण: भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तराची राज्य खालील प्रमाणे :
केरळ – 1084
पॉंडिचेरी – 1037
तामिळनाडू – 996
ग्रामीण लिंग गुणोत्तरात गोवा व केरळ हे राज्य 1000 पेक्षा अधिक गुणोत्तर आहे.
Talathi Bharti 2025 Question Paper 04 | तलाठी भरती 2023 TCS Pattern प्रश्नपत्रिका 04